डेरवण युथ गेम्स २०२१ मध्ये कोवॅसचे विद्यार्थी चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:29 AM2021-04-06T04:29:42+5:302021-04-06T04:29:42+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या सहकार्याने वालावलकर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या सहकार्याने वालावलकर ट्रस्ट डेरवणतर्फे ‘डेरवण युथ गेम्स २०२१’चे आयाेजन केले हाेते. या स्पर्धेतील याेगा प्रकारात चिपळुणातील कोवॅस व्यायाम शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन यश संपादन केले.
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये १० ते १२ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. योगा या खेळामध्ये १०० ते १२० खेळाडू होते. यामध्ये काेवॅसच्या खेळाडूंचा समावेश हाेता. १२ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक भावेश सचिन पाटील, द्वितीय क्रमांक अर्चित अनिल पाटील, मुलींमध्ये प्रथम क्रमांक भारवी सचिन पाटील, १४ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक नितेश नरेश मोरे, द्वितीय क्रमांक आर्यन संजय बहुतले, तृतीय क्रमांक आर्या उदय पोटे संपादन केले आहेत. या विद्यार्थ्यांना कोवॅस व्यायाम शाळेचे प्रशिक्षक सुहास पवार, संतोष जाधव, मधुकर पवार, सिद्धेश लाड, वेदांत पवार, करण शिरगावकर, ओमकार घोरपडे यांनी मार्गदर्शन केले.