रत्नागिरीत तातडीने शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल सुरु करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 04:42 PM2020-07-25T16:42:52+5:302020-07-25T16:44:07+5:30

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रत्नागिरीतील उद्यमनगर येथे आणखी एक शंभर खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आॅनलाईन पत्रकार परिषदेत दिली. यासाठी आपण एक राज्यस्तरीय बैठक घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Kovid Hospital with 100 beds will be started in Ratnagiri immediately | रत्नागिरीत तातडीने शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल सुरु करणार

रत्नागिरीत तातडीने शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल सुरु करणार

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरीत तातडीने शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल सुरु करणार-उदय सामंत यांची माहितीलवकरच कर्मचारी, परिचारिकांच्या जागा भरणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रत्नागिरीतील उद्यमनगर येथे आणखी एक शंभर खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आॅनलाईन पत्रकार परिषदेत दिली. यासाठी आपण एक राज्यस्तरीय बैठक घेतल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास, मेडिकल एज्युकेशनचे संजय मुखर्जी, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आरोग्य सभापती महेश म्हाप, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा वैद्यकीय अधिकारी बबिता कमलापूरकर, हेल्थ संचालिका अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाला कसा रोखता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. खेड उपजिल्हा रुग्णालय, कामथे उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णालय म्हणून सुरू राहतील. तसेच वालावलकर हॉस्पिटल नॉन कोविड हॉस्पिटल म्हणून सुरू केले जाईल, अशी माहिती सामंत यांनी दिली. त्याचबरोबर घरडा हॉस्पिटल, वसतिगृह, इमारत हेही जिल्हा प्रशासनाने ताब्यात घ्यावी व याठिकाणी कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, असेही ठरविण्यात आले. तसेच खाजगी रुग्णवाहिकाही भाड्याने घेण्याचा निर्णय झाला आहे.

लवकरच कर्मचारी, परिचारिका यांच्या रिक्त जागा भरल्या जातील, असेही सामंत यांनी सांगितले. एमबीबीएस डॉक्टर मिळाले नाहीत तर बीएएमएस घेतले जातील, जीएनएम परिचारिका मिळाल्या नाहीत तर एएनएम घेतल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

रत्नागिरीतील खासगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल करावे, असा विषयही या बैठकीत पुढे आला. रत्नागिरीतील काही डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल देण्यास परवानगी दिल्याचे सामंत यांनी सांगितले.

Web Title: Kovid Hospital with 100 beds will be started in Ratnagiri immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.