मंडणगड नगर पंचायतीतर्फे कोविड चाचणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:31+5:302021-05-29T04:24:31+5:30
मंडणगड : मंडणगड नगर पंचायतीच्या पुढाकाराने दि. २८ मे रोजी मंडणगड शहर व तालुक्यातील नागरिक, बाजारपेठेतील व्यापारी व ...
मंडणगड : मंडणगड नगर पंचायतीच्या पुढाकाराने दि. २८ मे रोजी मंडणगड शहर व तालुक्यातील नागरिक, बाजारपेठेतील व्यापारी व दुकानदारांकरिता कोविड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील १५०हून अधिक नागरिकांची चाचणी करण्यात आली.
या शिबिरामध्ये अँटिजन व आरटीपीसीआर अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. लवकरच या चाचण्यांचे अहवालही मिळतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह मुख्याधिकारी विनोद डौले यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज मर्चंडे, रविकुमार शिंदे, किरण साखरे, नितेश लेंढे यांच्यासह नगर पंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
---------------------
मंडणगड नगर पंचायतीतर्फे काेविड चाचणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या शिबिरात मंडणगड शहर व तालुक्यातील नागरिकांची चाचणी करण्यात आली.