मंडणगडात ५० एकरांत साकारणार कृषी विज्ञान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:39 AM2021-09-16T04:39:13+5:302021-09-16T04:39:13+5:30

- २०० कोटींचा प्रस्ताव लोकमत न्यूज नेटवर्क खेड : शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या पुढाकारातून मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे संस्थेच्या ...

Krishi Vigyan Kendra to be set up in 50 acres in Mandangad | मंडणगडात ५० एकरांत साकारणार कृषी विज्ञान केंद्र

मंडणगडात ५० एकरांत साकारणार कृषी विज्ञान केंद्र

Next

- २०० कोटींचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क

खेड : शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या पुढाकारातून मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे संस्थेच्या ५० एकर जागेत कृषी विज्ञान केंद्र साकारण्यात येणार आहे. २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेला प्रस्ताव केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, जिल्ह्यात सरासरी ३,५०० ते ४,००० हजार मिलिमीटर इतका पाऊस पडतो. २५ टक्के शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. मंडणगड, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर या पाच तालुक्यांत फळलागवड, भाजीपाला लागवड, शेतीसह मसाले पिकांची लागवड केली जाते. शेतीपूरक शेती व भाजीपाला फळलागवड, आदींवर विविध रोग, प्रतिबंधात्मक औषधे, मातीची तपासणी, मातीमध्ये कोणकोणते गुणधर्म आहेत? याबाबत शेतकऱ्यांना पुरेशी माहिती मिळत नाही. मात्र या कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन मिळणार आहे. पिकांवरील विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांना प्रभावी तंत्रज्ञानाचीही माहिती मिळत नसल्याने पारंपरिक शेतीवर भर दिला जातो. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या माध्यमातून साकारणारा हा प्रकल्प मंडणगडसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा ठरणार आहे, असे आमदार कदम यांनी सांगितले. या कृषी विज्ञान केंद्रासाठी माजी पर्यावरण मंत्री कदम यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरू असून, लवकरच या केंद्राला हिरवा कंदील मिळेल. या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण होऊन कृषी क्षेत्राच्या विकासालाही चालना मिळणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Krishi Vigyan Kendra to be set up in 50 acres in Mandangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.