लाेकमंच : फु्गे आणि पिपाण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:31 AM2021-03-26T04:31:40+5:302021-03-26T04:31:40+5:30

त्यावर उपाय आहे व तो म्हणजे परिसरातील, वाडीतील किंवा सोसायटीतील बालमित्रांशी दोस्ती ठेवणे. त्यांच्या संगतीमुळे आपण पुन्हा एकदा आपले ...

Lakemanch: Balloons and pipes | लाेकमंच : फु्गे आणि पिपाण्या

लाेकमंच : फु्गे आणि पिपाण्या

Next

त्यावर उपाय आहे व तो म्हणजे परिसरातील, वाडीतील किंवा सोसायटीतील बालमित्रांशी दोस्ती ठेवणे. त्यांच्या संगतीमुळे आपण पुन्हा एकदा आपले निष्पाप लहानपण काही क्षण अनुभवू शकतो. शिक्षकांची जी छोटी मुले आमच्या सोसायटीत आहेत, त्यांच्याशी माझ्या छान गप्पागोष्टी होतात. शिवाय उन्हाळ्यात मुंबईकडून इंग्लिश माध्यमातील शिक्षण घेणाऱ्या ज्या छोट्या, चुणचुणीत पाहुण्या येतात, त्यांच्याशी इंग्लिशमधून हितगूज घडते. या सगळ्या बालगोपाळांच्या गराड्यात मी माझे वाढते वय विसरून जातो.

चार नव्या ‘गोष्टी’ मला सुचतात व पुणे शहरातील पत्रिकांमध्ये त्या छापून येतात. त्या बालकथांचे श्रेय ‘काका काका’ करत माझ्याभोवती घोटाळणाऱ्या या सर्व छोट्या दोस्तांना आहे. त्या मुला-मुलींच्या मनात जे जे आहे, ते सगळे ती सांगून टाकतात. छोटी रिया तर पनवेलवरून पाहुणी येते. मला ती म्हणाली, ‘तुम्ही स्टोरी रायटर आहात ना? रायटर वगैरे म्हटलं की, मी अगदी एक्साईट होतो. कारण मलाही स्टोरीज तयार करायला आवडतं.... शाळकरी रियाचं चमकदार बोलणं मी ऐकतच राहतो आणि ही उमलती, उगवती पिढी किती स्मार्ट व शार्प आहे ते कळते. अर्थात प्रकृतीच्या दृष्टीने या लेकरांनी स्ट्राँग होणं हीसुद्धा काळाची गरज आहे!

- माधव गवाणकर, दापोली

Web Title: Lakemanch: Balloons and pipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.