हर्णे बंदरात पाच बोटी बुडून लाखो रुपयांची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 06:15 PM2017-09-19T18:15:38+5:302017-09-19T18:19:12+5:30
कोकणात गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टीमुळे समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आंजर्ले खाडीत तीन बोटी बुडाल्या तर पाजपंढरी आणि सुवर्णदुर्ग किल्ल््याजवळ दोन बोटी खडकावर आदळून फुटल्याने बोटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दापोली, दि. १९ : कोकणात गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टीमुळे समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आंजर्ले खाडीत तीन बोटी बुडाल्या तर पाजपंढरी आणि सुवर्णदुर्ग किल्ल््याजवळ दोन बोटी खडकावर आदळून फुटल्याने बोटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या पाच बोटीतील १0 खलाशाना बाहेर काढण्यात स्थानिक मच्छिमार बांधवाना यश आले असून काही मच्छिमार किरकोळ जखमी झाले आहेत, परंतु फुलचंद भय्या, दिपचंद भय्या आणि कैलाश जुवरकर हे तीन खलाशी सकाळपासून बेपत्ता आहेत.
हर्णे बंदरात जेटीची मागणी मच्छिमार बांधव गेली ३५ वर्षापासून मागणी करत आहेत, परंतु हर्णे बंदरातील जेटीकडे शासन दुर्लक्ष करत आहे. समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी मच्छिमार बांधवाना आपल्या बोटी आंजर्ले खाडीत किंवा सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला उभ्या कराव्या लागत आहेत, जेटी अभावी वादळ सदृश्य परिस्थितीत मच्छिमार बांधवाची कधी बोट बुडते तर कधी प्राणसुद्धा गमवावा लागत आहे.
मंडणगड तालुक्यात सकाळी साडेनऊ वाजता वादळी वाºयासह झालेल्या पावसात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली असून अनेक मार्गावर झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून यामुळे भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. शेतकरी राजा चिंतेत आहे. दिवसभरात १३८ मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्यात एकूण ३४६१ मिमी पाऊस झाला आहे.
आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. वाहन चालकांनी गाड्या सावकाश चालवाव्यात. प्रत्येकाने आपली स्वत:ची काळजी घ्यावी. सुरक्षित ठिकाणी राहावे. आपत्कालीन परिस्थिती आढळून आल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत पानवेकर यांनी केले आहे.
दरम्यान, मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यांना जोडणाºया मांदीवली पलावरुन भारजी नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने परिसरातील शेती पाण्याखाली आली आहे. तिडे व तळेघर या दोन गावांना जोडणाºया कुंबळे येथील कॉजवे वरुनही पाणी गेले असून सकाळपासुन वीज पुरवठाही खंडीत झाले आहे. दुरसंचार आणि इंटरनेट सेवाही ठप्प आहे.