कौंढरताम्हणेत उजळणार जनसेवेचे दीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:57+5:302021-07-16T04:22:57+5:30
चिपळूण : तालुक्यातील चिवेली येथील सुनील साळुंखे परिवाराच्या पुढाकाराने मुंबईतील दीप जनसेवा समितीतर्फे ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंचा मोफत ...
चिपळूण : तालुक्यातील चिवेली येथील सुनील साळुंखे परिवाराच्या पुढाकाराने मुंबईतील दीप जनसेवा समितीतर्फे ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंचा मोफत पुरवठा सुरू आहे. १७ जुलै रोजी कौंढरताम्हणे येथील ३३४ ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले जाणार आहे. यावेळी सुनील साळुंखे परिवार उपस्थित राहणार आहे.
कोरोना आपत्तीत गेले दीड वर्षभर सर्वसामान्यांचा रोजगार बुडाला आहे. ग्रामीण भागात तर याची झळ मोठ्या प्रमाणात बसली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, असे गरीब, गरजू मजूर, कामगार यांचे मोठे हाल झालेले आहेत. आता तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असे सांगितले जात आहे. त्यांना खऱ्याअर्थाने मदतीची गरज आहे. हे ओळखून साळुंखे परिवाराने जनसेवा समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्याचे हे व्रत अंगिकारले आहे. आपण जीवन जगताना समाजाचेही काही देणे लागतो, या भावनेने प्रेरित होऊन जीवनावश्यक वस्तू वाटपाचा उपक्रम गाव-वाडीवार सुरू आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास साळुंखे, सुभाष साळुंखे व दीपक साळुंखे मेहनत घेत आहेत.