मुसळधार पावसाने विहीर जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:32 AM2021-07-27T04:32:51+5:302021-07-27T04:32:51+5:30

चिपळूण : तालुक्यातील रिक्टोली-इंदापूरवाडी हे गाव अत्यंत डोंगरात सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी दुर्गम भागात आहे. पावसामध्ये दरड कोसळल्यामुळे जिल्हा परिषदेने ...

Landslide in torrential rains | मुसळधार पावसाने विहीर जमीनदोस्त

मुसळधार पावसाने विहीर जमीनदोस्त

Next

चिपळूण : तालुक्यातील रिक्टोली-इंदापूरवाडी हे गाव अत्यंत डोंगरात सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी दुर्गम भागात आहे. पावसामध्ये दरड कोसळल्यामुळे जिल्हा परिषदेने बांधून दिलेली नवीन विहीर पूर्ण जमीनदोस्त झाली आहे आणि जो खराब रस्ता होता, तो सुध्दा पूर्ण खचून गेला आहे.

ट्रकचालकांना भोजन

साखरपा : कोंडगावमधील सार्वजनिक गणेश मित्रमंडळामार्फत आंबा घाटात अडकलेल्या ट्रक चालकांना शुध्द पाण्याची बाटली, भोजनाची पॅकेटस् देण्यात आली आहेत. मुख्य रस्ता खचल्याने पुढील आदेशापर्यंत आंबा घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहने अडकली आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

राजापूर : राजापूर रेल्वेस्टेशन मार्गावरील पांगरे-बौध्दवाडी रस्त्यावर झाडे पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावरील दुतर्फा असलेला झाडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, तर गुरुवारी पुन्हा एकदा अर्जुना नदीला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

अनेक जनावरे गेली वाहून

चिपळूण : निसर्गाच्या रौद्ररूपासमाेर काहीही टिकलेले नाही. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला होता. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे हाल झाले आहेत. महापुराच्या पाण्यात स्थानिक रहिवाशांनी आपले जीव कसेबसे वाचविले; मात्र श्वान, मांजरे व इतर पाळीव प्राण्यांना वाचवू शकले नाही.

लसीकरणाच्या कामावर परिणाम

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना महामारीबरोबरच महापुराने हाहाकार उडविला आहे. त्यामुळे लसीकरणाला आलेली गती पुन्हा थांबली आहे. उत्तर रत्नागिरीमध्ये महापुराची स्थिती असल्याने संगमेश्वर, चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली या पाचही तालुक्यांतील लसीकरणावर परिणाम झाला आहे.

Web Title: Landslide in torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.