बेपत्ता भाजप पदाधिकाऱ्याचा मृतदेह जंगलात आढळला, तब्बल दहा दिवसांनी लागला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 03:34 PM2022-08-22T15:34:58+5:302022-08-22T15:35:59+5:30
रावारी आणि बापेरे गावच्या सीमेलगत असलेल्या जंगलात आढळला मृतदेह
लांजा : लांजा येथील भाजपचे पदाधिकारी प्रसन्ना रामकृष्ण दीक्षित यांचा मृतदेह जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तब्बल दहा दिवसांनी त्यांचा शोध लागला. घरगुती भांडणातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भाजपा पदाधिकारी असलेले प्रसन्ना दीक्षित हे लांजा येथील रावारी ब्राह्मणवाडी येथील रहिवासी होते. घरगुती भांडणातून १२ ऑगस्टपासून ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता.
तब्बल दहा दिवसानंतर सोमवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांचा मृतदेह रावारी आणि बापेरे गावच्या सीमेलगत असलेल्या जंगलात आढळला.