ब्रेक निकामी झाल्याने लांजा-रत्नागिरी बसला अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By अरुण आडिवरेकर | Published: October 18, 2022 01:15 PM2022-10-18T13:15:01+5:302022-10-18T13:15:58+5:30

याच दरम्यान शाळा सुटली होती. मात्र, चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून गाडी बाजूला नेल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

Lanja Ratnagiri bus accident due to brake failure | ब्रेक निकामी झाल्याने लांजा-रत्नागिरी बसला अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

ब्रेक निकामी झाल्याने लांजा-रत्नागिरी बसला अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

googlenewsNext

पावस : लांजा येथून सुटलेल्या एसटी बसला पावस येथील उतारात ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान झाला. या रस्त्याच्या कडेलाच लागून दोन घरे असून, सुदैवाने गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झाडावर अडकून राहिल्याने मोठी घटना घडली.

लांजा - रत्नागिरी (एमएच ४०, एन ९८४१) ही गाडी लांजा आगारातून सात विद्यार्थ्यांसह ९ प्रवाशांना घेऊन सकाळी १०.३० वाजता सुटली. धोपटवाडी येथील शाळेची सात मुले दुपारच्या सत्रासाठी पावस शाळेत येत होती. ही गाडी देवधे मार्गे पावस येथे येत असताना पावस येथील उतारात हा अपघात झाला. एसटी बसच्या समोर दोन रिक्षा आणि एक डंपर जात होता. या वाहनांना वाचविण्यासाठी बस चालकाने ब्रेक मारला. मात्र, त्याचक्षणी निकामी झाल्याचे लक्षात आले.

चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला एका बांधाच्या सहाय्याने थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गाडी कलंडली आणि रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झाडावर अडकले. या रस्त्याच्या कडेलाच दोन घरे असून, या घरांवर ही गाडी कोसळता कोसळता वाचली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

याच दरम्यान शाळा सुटली होती. मात्र, चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून गाडी बाजूला नेल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. या अपघाताची माहिती मिळताच पूर्णगड पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्यासह एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Lanja Ratnagiri bus accident due to brake failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.