लांजा : वीज पडून, वाहिनी तुटून तीन जनावरे ठार, गुराखी जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 05:08 PM2018-09-29T17:08:07+5:302018-09-29T17:13:01+5:30

गेली दोन दिवस विजांचा कडकडाट सह आणि ढगांचा गडगडाटीसह कोसळणार्या परतीच्या पावसाने लांजा तालुक्याला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातीँल माचाळ या  ठिकाणी पडलेल्या विजेने तिन जनावरे जागीच

Lanja: Three people were killed, the cowboy was injured when the electricity fell, the channel collapsed | लांजा : वीज पडून, वाहिनी तुटून तीन जनावरे ठार, गुराखी जखमी 

लांजा : वीज पडून, वाहिनी तुटून तीन जनावरे ठार, गुराखी जखमी 

Next
ठळक मुद्देशेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले घटनेचा पंचनामा करण्यात आला.

लांजा : गेली दोन दिवस विजांचा कडकडाट सह आणि ढगांचा गडगडाटीसह कोसळणार्या परतीच्या पावसाने लांजा तालुक्याला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातीँल माचाळ या  ठिकाणी पडलेल्या विजेने तिन जनावरे जागीच ठार गुराखी गंभीर जखमी झाला. लांजा भटवाडी येथे वादळी वाऱ्याने विद्युत वाहिन्या तुटून दोन गायी व एक वासराचा जागीच मृत्यू झाल्याच्या दोन घटना शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान घडल्या. तालुक्यात  दोन ठिकाणी घडलेल्या घटनांनी संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले  आहेत अशी सहा गुरे दगावली आहेत.
       

सायंकाळच्याच दरम्यान गेले दोन दिवस ढगांच्या गडगडाटी व वादळी वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसाने साऱ्याचीच तारांबळ उडवली आहे. वादळी पावसामुळे भातशेती जमीनदोस्त होत आहे. त्यामुळे हाताशी आलेले भातपिक गमावण्याची भितीही शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. भात शेतीसह वादळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्याची जनावरे दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या वादळी पावसाने लांजा तालुक्यातील माचाळ पाटीलवाडी येथील शिवाजी खंडू पाटील हे माळराणावर आपली गुरे घेऊन चारण्यासाठी दुपारी ३.३० वाजता घेऊन गेले होते.

दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान पडलेल्या वादळी पावसामध्ये अचानक तीन गुरांवर विज पडली. यामध्ये एक रेडा व दोन म्हैसी जागीच ठार झाल्या तर गुरांच्या शेजारीच उभे असलेले शिवाजी पाटील यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला यामध्ये पाटील हे बेशुद्धावस्थेत खाली पडले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाटील यांना उपचारासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये  दाखल केले. मात्र पाटील यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना रत्नागरी येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पालू ग्रामपंचायतीचे सरपंच सुहास नामे, उपसरपंच भारत कांबळे, मंडल अधाकारी, कृषी अधिकारी व तलाठी आर.आर खेडेकर व ग्रामपंचायत सदस्यांनी भेट दिली.या घटनेचा पंचनामा केला असता  ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले आहे.

 लांजा शहरातील भटवाडी येथील ह्रषिकेश गोखले या शेतकऱ्याच्या दोन गाभण गायी व एक वासरु अशी तीन जनावरे महावितरणची विद्युत वाहिनी तुटून पडून जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. यामध्ये गोखले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मृत झालेल्या गायी या गिरी जातीच्या होत्या. सकाळी नियमीत गुरे चारण्यासाठी महिला स्वतः कंपाऊडचा दरवाजा उघडून गुरांना पुढे पाठवत असे. मात्र सकाळी गुरांना सोडल्यानंत्तर गुरे कंपाऊंडकडे गेली आणि नकळत जमिनीवर पडलेल्या महावितरणच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने दोन गायी व एक पाडा ठार झाल्या. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेची ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोनवरुन माहिती दिली.मात्र दोन तास झाले तरी महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहचले नव्हते. उशिराने दाखल झालेल्या  अधिकाऱ्यांना  ग्रामस्थांनी  चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. या घटनेची खबर मिळताच नगराध्यक्ष सुनिल तथा राजू कुरूप , नगरसेविका प्रणिता बोडस आदीसह ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते .  

Web Title: Lanja: Three people were killed, the cowboy was injured when the electricity fell, the channel collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.