Ratnagiri News: देवगडमध्ये सापडले सर्वात मोठे कातळशिल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 03:50 PM2022-12-29T15:50:56+5:302022-12-29T15:51:18+5:30
कातळशिल्प आडरानात असल्यामुळे दुर्लक्षित होते
देवगड : देवगड तालुक्यातील वानिवडे गावामध्ये देवगडमधील सर्वात मोठे कातळ शिल्प सापडले आहे. गावातील डॉ. बाळासाहेब देसाई यांना या कातळशिल्पाबद्दल खूप कुतूहल होते. त्यामुळे कातळशिल्पाची स्वच्छता ठेवणे, गावकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे यासारख्या गोष्टी ते करत होते. अशीच जागृती करत असताना त्यांचे मित्र इमरान साठविलकर यांनी कालवी रहाटेश्वर या भागातही असेच कातळशिल्प आहे, असे सांगितले.
त्यानंतर डॉ. देसाई यांनी वेळ न घालवता शोध मोहीम सुरू केली कालवी रहाटेश्वर गावचे रवी ठुकरूल या कातळशिल्पापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला कातळशिल्प आडरानात असल्यामुळे दुर्लक्षित होते गवत व गाळ साचून ते अस्पष्ट दिसत होते. डॉक्टर देसाईंनी कातळशिल्पची साफसफाई करायचं ठरवले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी त्यांच्या दोन सहकार्य सह पावणाई गावचे सुधीर ठुकरूल व दीपक दळवी शिल्पाची साफसफाई करायला सुरुवात केली या कार्यात डॉ. सीमा देसाई व त्यांची कन्या संचिता देसाई यांनीही हातभार लावला.
कातळ शिल्पाच्या अधिक माहितीसाठी इतिहास संशोधन मंडळ देवगडचे रंजीत हेर्लेकर व अजित टाककर यांना बोलावण्यात आले. यावेळी हेर्लेकर म्हणाले हे मांडा प्रकारात मधील कातळ शिल्प आहे याच्या एक बाजूला मानवी आकृती असते व एक पाऊल खुणा असतात. पुढे त्याचे मोजमापे घेतले असता देवगड तालुक्यातील आतापर्यंतच्या मिळालेल्या शिल्पापैकी हे कातळ शिल्प मोठे आहे आणि त्याची खोली ही जास्त आहे.