रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन खेड तालुका : विसर्जनस्थळी नगरपालिकेकडून रोषणाई
By admin | Published: September 16, 2016 09:38 PM2016-09-16T21:38:16+5:302016-09-16T23:48:21+5:30
सावर्डेत चैतन्य सोहळ्याची सांगता-- चिपळुणात गणरायाचे विसर्जन --गणपतीपुळे परिसरात बाप्पाला निरोप
मंडणगडात गणेशोत्सवाची सांगता
लांजात वाजत - गाजत विसर्जन
संगमेश्वर तालुक्यात भावपूर्ण निरोप
दापोलीत पारंपरिक पद्धतीने मूर्तींना निरोप
नऊ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन$$्निराजापूर तालुका : पोलीस बॉईज गणपतीचे अनंत चतुर्दशीनंतर विसर्जन
खेड : खेड शहर व तालुक्यातील १४ सार्वजनिक आणि घरगुती १९९७ गणेशमूर्तींचे अनंत चतुर्दशीला जगबुडी नदीत शांततेत विसर्जन करण्यात आले.़ यावेळी निघालेल्या मिरवणुकांमधील भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. शिवसेना आणि मनसेतर्फे आयोजित सार्वजनिक उत्सव गणेशमूर्तींचे विजर्सन केल्यानंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास खोंडे (जोगळेकरवाडी)तील गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. खेड नगरपालिकेच्यावतीने विसर्जनस्थळी विद्युत रोषणाई करण्यात आली होती़ पोलिसांनीदेखील चोख बंदोबस्त ठेवला होता.
शहरातील शिवसेनेच्या सार्वजनिक गणेशोत्सवासह मनसेचा सार्वजनिक गणेशोत्सव, वडार समाज सार्वजनिक गणेशोत्सव, महात्मा फुलेनगर - खेड, नातूवाडी प्रकल्प वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव - भरणे, महाराष्ट्र बेलदार समाज सार्वजनिक गणेशोत्सव - भरणे, वडार समाज संघटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - दस्तुरी, वडार समाज युवक मंडळ - भरणे पुरस्कृत जयगणेश मित्रमंडळ गणेशोत्सव, संघर्ष मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - भरणेनाका, सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ - आंबवली, गणेश मित्रमंडळ - कळंबणी बुद्रुक, जयहिंद गणेश मित्रमंडळ - घाणेकुंट, एमआयडीसी गणेश उत्सव मित्रमंडळ - पीरलोटे, अग्निशामक कर्मचारी गणेश मित्रमंडळ - लोटे, मुरली मनोहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गुजरआळी, खेड, एस्. टी़ आगार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - खेड, बंजारा समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - वेरळ, आदींसह खेड तालुक्यातील १४ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
विशेष म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करीत आणि पोलिसांच्या सूचनेचे पालन करीत या मंडळांनी अत्यंत शांततेत विसर्जन केले़ यावेळी ख्ोड नगरपालिकेच्या सुरक्षा पथकांसह जगबुडी नदीकिनारी होड्या आणि पाणबुडी कर्मचारी यांची व्यवस्था करण्यात आली होती़ खेडच्या नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये- पाटणे व मुख्याधिकारी महादेव रोडगे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते़ खेड शहरातील खासगी गणपती दुपारी ४ वाजल्यापासूनच विसर्जनासाठी बाहेर पडले होते़ तर शिवसेना आणि मनसेच्या गणपती मिरवणुकीला ६ वाजल्यापासून प्रारंभ केला. विसर्जनस्थळी आलेल्या गणरायांवर बिपीन पाटणे यांनी पुष्पवृष्टी केली. (प्रतिनिधी)