लातूर बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:03+5:302021-07-07T04:39:03+5:30
कोरोना केंद्र सुरू दापोली : तालुक्यातील केळशी येथील महावीर भवनात सुरू असलेल्या कोरोना केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. पंचक्रोशीतील प्रशस्त ...
कोरोना केंद्र सुरू
दापोली : तालुक्यातील केळशी येथील महावीर भवनात सुरू असलेल्या कोरोना केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. पंचक्रोशीतील प्रशस्त अशी जैन समाजाची इमारत कोरोना रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. बन्सीलाल जैन यांच्याहस्ते कोरोना केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
अक्कलकोट बसफेरी सुरू
चिपळूण : प्रवाशांच्या मागणीनुसार चिपळूण आगारातून अक्कलकोट बसफेरी सुरू करण्यात आली आहे. सकाळी ७.३० वाजता व रात्री ९.३० वाजता आगारातून ही फेरी रवाना होणार आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिपळूण आगारातर्फे करण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून महामंडळाकडून बसफेऱ्यांची संख्या वाढविण्यात येत आहे.
स्पर्धेचा निकाल जाहीर
खेड : तालुक्यातील अपेडे येथील कदम फाऊंडेशनतर्फे पर्यावरण दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेमध्ये ३६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. सात वर्षांपर्यंतच्या गटात यती खेडेकर हिने यश संपादन केले आहे.
डॉक्टरांचा सत्कार
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड पोलीस स्थानकातर्फे परिसरातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर दिनाचे औचित्य साधून जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शासकीय रुग्णालय व खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
आंबे मुबलक
रत्नागिरी : परजिल्ह्यातील आंबे मुबलक स्वरुपात विक्रीसाठी आले आहेत. लंगडा, केशर, दशहरी, बलसाड, नीलम आदी विविध प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत. ६० ते १५० रुपये किलो दराने आंब्याची विक्री सुरू आहे. शहरातील नाक्यानाक्यावर तसेच हातगाडीवर आंबा विक्री सुरू आहे.