कृषी संजीवनी मोहिमेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:35+5:302021-06-23T04:21:35+5:30
रत्नागिरी : कृषी तंत्रज्ञानामधील छोटीशी सुधारणा पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व ...
रत्नागिरी : कृषी तंत्रज्ञानामधील छोटीशी सुधारणा पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सोमवारी (दि. २१) मोहिमेचा शुभारंभ झाला असून, दि.१ जुलैअखेर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषिमित्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बुधवार दि. २३ जून रोजी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, दि. २५ रोजी विकेल ते पिकेल, दि. २८ जून रोजी तालुक्यातील दोन पिकांची उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, दि. २९ रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, दि. ३० रोजी जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना, दि. १ जुलै रोजी कृषिदिन व माेहिमेचा समारोप होणार आहे.