खानू येथे ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:50+5:302021-05-05T04:52:50+5:30
रत्नागिरी : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फेे ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणास प्रारंभ झाला आहे. खानू येथेही या ...
रत्नागिरी : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फेे ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणास प्रारंभ झाला आहे. खानू येथेही या मोहिमेस प्रारंभ झाला असून, निवासी जिल्हाधिकारी दत्ता भडकवार यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
कोरोनाकाळात प्रत्येकाने आरोग्याची घ्यावयाची काळजी, शिवाय कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना बरा होतो, मात्र आरोग्य सुरक्षेबाबत दक्षता घेणे गरजेचे असून, वेळीच औषधोपचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावोगावी ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ सर्वेक्षण सुरू केले आहे. खानू येथे या सर्वेक्षण शुभारंभासाठी निवासी जिल्हाधिकारी दत्ता भडकवार, सरपंच गणेश सुवारे, खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
सुरक्षित अंतर ठेवत ग्रामस्थांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या माध्यमातून ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ सर्वेक्षण राबविण्यात येत असून, ग्रामस्थांचा त्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे.
...................................
रत्नागिरी तालुक्यातील खानू येथेही या मोहिमेस प्रारंभ झाला असून, निवासी जिल्हाधिकारी दत्ता भडकवार यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच गणेश सुवारे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.