रांगव येथे नदी पुनरूज्जीवन गाळ उपसा उपक्रमाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:29 AM2021-04-06T04:29:46+5:302021-04-06T04:29:46+5:30

रांगव (ता. संगमेश्वर) येथील नदी पुनरूज्जीवन कामाचा शुभारंभ जलपूजनाने करण्यात आला. लाेकमत न्यूज नेटवर्क आरवली : संगमेश्वर तालुक्यातील रांगव ...

Launch of River Rejuvenation Sludge Upstream Project at Rangav | रांगव येथे नदी पुनरूज्जीवन गाळ उपसा उपक्रमाचा शुभारंभ

रांगव येथे नदी पुनरूज्जीवन गाळ उपसा उपक्रमाचा शुभारंभ

Next

रांगव (ता. संगमेश्वर) येथील नदी पुनरूज्जीवन कामाचा शुभारंभ जलपूजनाने करण्यात आला.

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील रांगव येथे नाम फाऊंडेशनच्या सहकार्यातून ग्रामस्थांनी नदी पुनरूज्जीवन व गाळ उपसा उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जलपूजनाने करण्यात आला.

मौजे रांगव गावातील दोन्ही बाजूस असणाऱ्या नदीतील गाळ उपसा व नदी पुनरूज्जीवन कामासाठी रांगव गावातील मुंबईस्थित युवा संघटनेचे पदाधिकारी गेली दोन वर्षे नाम फाऊंडेशनच्या संपर्कात होते. याची दखल घेत नाम फाऊंडेशनने सहकार्याचा हात पुढे केला आहे. याकामी मदतीसाठी परिसरातील लोकप्रतिनिधी, राजकीय नेते मंडळी पुढे सरसावली आहे. जलतज्ज्ञ अविनाश निवते व अमित गोखले यांनी कामाची पाहणी करून आराखडा तयार केला.

ग्रामदेवता मंदिरात ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालून कामाची सुरुवात करण्यात आली. तीन गावचे मानकरी असणारे श्रीकांत सरमोकदम उभयतांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. यावेळी सुवासिनींच्या हस्ते नदीची ओटी भरून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

त्यानंतर ग्रामदेवता मंदिरात बैठक पार पडली. या बैठकीला माजी शिक्षण व अर्थ सभापती सहदेव बेटकर, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, माजी सभापती प्रेरणा कानाल, नाम फाऊंडेशनचे समन्वयक समीर जानवलकर, आशिष सरमोकादम उपस्थित हाेते.

तसेच व्यासपीठावर गावचे गावकर विरेश कुंभार, लवू कानाल, कृष्णा रागवकर, संतोष धामणस्कर, युवा संघटना अध्यक्ष सुधीर मिरगल, सचिव संजय मिरगल, चेतन रांगणेकर, यशवंत कुंभार, सरपंच दत्ताराम लाखन, चंद्रकांत मिरगल, बाबू कुंभार, प्रकाश वाकणकर, प्रशांत रांगणेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत शिंदे यांनी केले.

Web Title: Launch of River Rejuvenation Sludge Upstream Project at Rangav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.