अडखळ येथे कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:33 AM2021-09-27T04:33:41+5:302021-09-27T04:33:41+5:30

दापोली : तालुक्यातील अडखळ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये १५व्या वित्त आयोगअंतर्गत कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत नारी शक्ती ...

Launch of Skill Development Scheme at Adkhal | अडखळ येथे कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ

अडखळ येथे कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ

Next

दापोली : तालुक्यातील अडखळ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये १५व्या वित्त आयोगअंतर्गत कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत नारी शक्ती सोशल फाऊंडेशन, गोकुळ शिरगाव आणि ग्रामपंचायत अडखळ यांच्यातर्फे येथील ३५ महिलांसाठी शिवण क्लास सुरू करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन अडखळचे सरपंच रवींद्र घाग यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रकल्प अधिकारी रसिका आंबेकर, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जहुर कोंडविलकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम, अंजली मळेकर, मनाली चौधरी, दर्शना कदम, रमिझा काझी, दापोली तालुका संपर्क प्रतिनिधी निकिता बालगुडे, प्रशिक्षक सना काझी, अस्मा वाकणकर, दिनेश कदम उपस्थित होते.

गावागावांत कौशल्य विकास योजनेतून अधिकाधिक रोजगार उपलब्ध करणे हा मुख्य उद्देश आहे. यातूनच ग्रामीण भागात आर्थिक क्रांती होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. अडखळ ग्रामपंचायतअंतर्गत ३५ महिलांनी शिवण क्लासमध्ये भाग घेतला असून, हे प्रशिक्षण एक महिन्याचे असणार आहे.

Web Title: Launch of Skill Development Scheme at Adkhal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.