रत्नागिरी जिल्हा प्रश्नांच्या डोंगरात नेतृत्वहीन, मोर्चा, आंदोलनातून असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 07:11 PM2018-02-08T19:11:30+5:302018-02-08T19:15:30+5:30

रत्नागिरी जिल्ह्यात विविध समस्यांची साखळी तयार झाली असून, त्यामध्ये सामान्य माणसाची घुसमट सुरू आहे. प्रदूषणकारी प्रकल्प लादले जात आहेत.

Leadershipless, morcha, agitation by dissent in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्हा प्रश्नांच्या डोंगरात नेतृत्वहीन, मोर्चा, आंदोलनातून असंतोष

रत्नागिरी जिल्हा प्रश्नांच्या डोंगरात नेतृत्वहीन, मोर्चा, आंदोलनातून असंतोष

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा प्रश्नांच्या डोंगरात नेतृत्वहीनमोर्चा, आंदोलनातून असंतोष

रत्नागिरी : जिल्ह्यात विविध समस्यांची साखळी तयार झाली असून, त्यामध्ये सामान्य माणसाची घुसमट सुरू आहे. प्रदूषणकारी प्रकल्प लादले जात आहेत.

विविध विकास प्रश्न लोंबकळत पडले आहेत. त्यामुळे मोर्चे, आंदोलने यातून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. तरीही राजकीय पक्षांमध्ये हुतूतू सुरू आहे. त्यामुळे या समस्यांवर उत्तर घेणारे सक्षम राजकीय नेतृत्वच जिल्ह्यात उरले नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया आता जनतेतून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रश्न, समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. राज्यात अन्यत्र राजकीय पक्षांच्या नेत्यांची विकासकामांसाठी, त्यांच्या भागातील समस्या सोडविण्यासाठी एकी दिसून येते, लॉबी दिसून येते. त्यासाठी पक्षभेद बाजुला ठेवला जातो. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात विकासाच्या मुद्द्यावर पक्षभेद विसरून एकत्र येण्याचा इतिहास आजही राजकीय नेते, कार्यकर्त्यांना निर्माण करता आलेला नाही.

जनतेच्या जिव्हाळ्याच्या सामायिक प्रश्नांसाठी येथील आमदार, खासदार एकत्र येत नाहीत आणि त्यांना विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आणणारे सक्षम नेतृत्वही जिल्ह्यात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील समस्यांचा डोंगर झाला असून, सामान्यांच्या या समस्यांचा कोणाला कळवळाच नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार उदय सामंत यांच्याकडे आहे. संयमी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. चिपळूण विभागात गुहागरचे आमदार व माजी पालकमंत्री भास्कर जाधव म्हणजे धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात.

चिपळुणात सेनेचे आमदार सदानंद चव्हाण कार्यरत आहेत, तर दापोली मंडणगडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम व राजापूरमध्ये सेनेचे आमदार राजन साळवी कार्यरत आहेत. खासदार विनायक राऊत व अनंत गीते हे खासदार म्हणून जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करीत आहेत.

रवींद्र वायकर हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु विकासाच्या प्रश्नांवर हे प्रभावी लोकप्रतिनिधी एकत्र येत नाहीत, हा जनतेचा आरोप आहे. जिल्ह्यात रिफायनरीविरोधात आंदोलन सुरू आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. चौपदरीकरणातही अनेक अडथळे येत आहेत. आंदोलने, मोर्चे सुरू आहेत. परंतु प्रभावी नेतृत्त्वाची वानवा असल्याची टीका होत आहे.

Web Title: Leadershipless, morcha, agitation by dissent in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.