गळती थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:35 AM2021-08-12T04:35:24+5:302021-08-12T04:35:24+5:30

दापोली : दापोली आगाराच्या कार्यालयाला पावसामुळे गळती लागली होती, परंतु, महामंडळाकडून या छपराची डागडुजी करुन ही गळती थांबवली आहे. ...

The leak stopped | गळती थांबली

गळती थांबली

Next

दापोली : दापोली आगाराच्या कार्यालयाला पावसामुळे गळती लागली होती, परंतु, महामंडळाकडून या छपराची डागडुजी करुन ही गळती थांबवली आहे. आगाराच्या मुख्य कार्यालयात छपरातून पाणी आत येत होते. पाऊस थांबल्यामुळे या छपराच्या डागडुजीचे काम करुन गळती थांबवण्यात आली आहे.

श्वानांची दहशत

खेड : शहरात मोकाट जनावरांसह गाढवांचा मुक्त संचार सुरु असतानाच मोकाट श्वानांची भर पडल्याने नागरिक धास्तावले आहेत. भर रस्त्यात मोकाट श्वानांच्या झुंडीच्या झुंडी वावरत असल्याने नागरिकांना घाबरतच मार्गक्रमण करावे लागत आहे. या श्वानांच्या बंदोबस्तासाठी नगर प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी हाेत आहे.

विद्यार्थ्यांची गैरसाेय

राजापूर : शहरातील औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या सुमारे तीस विद्यार्थ्यांना राजापुरात येण्यासाठी एस. टी. बस नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे पाचल परिसरातून सकाळी ७.३० व सायंकाळी ४.४५ या वेळेत बस सोडावी, अशा मागणीचे पत्र राजापूर आगाराला देण्यात आले आहे.

एक हात कर्तव्याचा

गुहागर : एक हात कर्तव्याचा या अभियानांतर्गत मालघर ग्रामपंचायतीचे कृती दल व चिपळूण पोलीस दल यांच्यातर्फे चिपळूण पूरग्रस्त भागात साफसफाई करण्यात आली. महापुरानंतर शहरातील अनेक भागात चिखल पसरला होता. तो काढण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यात पोलीस अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

महासंघ मदतीला

खेड : पिंपरी-चिंचवड येथील कोकण विकास महासंघातर्फे खेड शहरासह चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन मदत करण्यात आली. महाड, साखर-सुतारवाडी, पोलादपूर, पोसरे, धामणंद, बिरमणी या गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत २२ कुटुंबीयांना रोख अर्थसहाय्य करण्यात आले.

स्वच्छता मोहीम

खेड : आम्ही शिवभक्त संघटनेतर्फे चिपळूण पेठमाप, गोवळकोट, खेर्डी, भोईवाडी, मुरादपूर आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पुराच्या पाण्यामुळे घरात कचरा व चिखल साचल्याने स्वच्छतेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या सर्व स्वच्छतेला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी आंबये - सकपाळवाडी येथील तरुणांचे सहकार्य लाभले.

Web Title: The leak stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.