बिबट्याने घरात शिरून केला महिलेवर हल्ला, महिला गंभीर जखमी; संगमेश्वर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 11:38 AM2022-06-27T11:38:18+5:302022-06-27T11:38:46+5:30

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

leopard broke into a house and attacked a woman In Sangameshwar taluka | बिबट्याने घरात शिरून केला महिलेवर हल्ला, महिला गंभीर जखमी; संगमेश्वर तालुक्यातील घटना

बिबट्याने घरात शिरून केला महिलेवर हल्ला, महिला गंभीर जखमी; संगमेश्वर तालुक्यातील घटना

Next

देवरुख : बिबट्याने घरात शिरून महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यात घडली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी महिलेला बाहेर काढल्याने बिबट्या घरातच अडकला. अन् जिवितहानी टळली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील नजीकच्या वाशी सहाणेची वाडी येथे आज, सोमवारी सकाळी बिबट्याने थेट घरात शिरत महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी त्या महिलेला बाहेर काढले. अन् बिबट्या घरातच अडकला. जखमी महिलेला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

गेल्या काही दिवसापासून वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. मात्र आता वन्यप्राण्यांकडून नागरिकांवर भेट हल्ले होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. वनविभागाने यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: leopard broke into a house and attacked a woman In Sangameshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.