Ratnagiri: राजापुरात बिबट्याचा उपासमारीने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:43 AM2024-07-11T11:43:18+5:302024-07-11T11:44:09+5:30

राजापूर : तालुक्यातील सोलगाव, देवीची गुरववाडी येथील वसंत नारायण गुरव यांच्या घराच्या बाहेरील भागामध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. सदर ...

Leopard died of starvation in Rajapur | Ratnagiri: राजापुरात बिबट्याचा उपासमारीने मृत्यू

Ratnagiri: राजापुरात बिबट्याचा उपासमारीने मृत्यू

राजापूर : तालुक्यातील सोलगाव, देवीची गुरववाडी येथील वसंत नारायण गुरव यांच्या घराच्या बाहेरील भागामध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. सदर बिबट्याचा भूकेने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला. 

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार सोलगाव देवीची गुरववाडी येथील वसंत गुरव हे मुंबईला वास्तव्यास असून त्यांचे घर बंदस्थितीत असते. बुधवारी दुपारी गुरव यांच्या घराशेजारी बिबट्या असल्याची शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ याबाबत वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र घराबाहेर असलेला बिबट्या मृत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बिबट्याची तपासणी करण्यात आली. मृत बिबट्या मादी असून 5 ते 6 महिने वयाचा असल्याचे तसेच तो भूकेने मृत झाल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला . यावेळी रत्नागिरी परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार, राजापूर वनपाल जयराम बावदाणे, रत्नागिरी लेखापाल तानाजी पाटील, राजापूर वनरक्षक विक्रम कुंभार यांच्यासह अनिकेत मोरे, नितेश गुरव आदी उपस्थित होते.

Web Title: Leopard died of starvation in Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.