चिपळूणमध्ये बिबट्याची गोळी घालून शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 02:49 PM2017-11-04T14:49:56+5:302017-11-04T14:50:10+5:30
शिकारीला बंदी असताना आजही रत्नागिरी जिल्ह्यात प्राण्यांची शिकार केली जात आहे.
रत्नागिरी - शिकारीला बंदी असताना आजही रत्नागिरी जिल्ह्यात प्राण्यांची शिकार केली जात आहे. त्यातही फासकी लावण्याचा प्रकार अनेकदा होत असून यामध्ये आजवर अनेक बिबट्यांना आपला जीव गमावला लागला आहे.
पण आता मात्र बिबट्याला गोळी घालून शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिपळूण तालुक्यातील कुटरे झिनगर वाडी येथील शेतामध्ये एक बिबट्या मृतावस्थेत सापडला आहे. या बिबट्याची शिकार करण्यात आली असून त्याच्या पाठीत गोळीदेखील आढळून आली आहे.
या प्रकाराची माहिती वनखात्याला देण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.