रत्नागिरी : फासकीतून सुटलेल्या बिबट्याचा शोध अजून सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:06 PM2018-12-12T14:06:27+5:302018-12-12T15:22:51+5:30
पाच ग्रामस्थांना जखमी करून पळालेल्या बिबट्याचा शोध अजून सुरूच आहे. वन खात्याचे १५ कर्मचारी गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत ही शोध मोहीम राबवत आहेत. आता मुंबईच्या मदत पथकाची वन खात्याला प्रतीक्षा आहे.
शिरगाव (चिपळूण) : पाच ग्रामस्थांना जखमी करून पळालेल्या बिबट्याचा शोध अजून सुरूच आहे. वन खात्याचे १५ कर्मचारी गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत ही शोध मोहीम राबवत आहेत. आता मुंबईच्या मदत पथकाची वन खात्याला प्रतीक्षा आहे.
गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या कुंपणानजीक मंगळवारी एक बिबट्या फासकीत अडकला. त्याला सोडवण्यासाठी वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ पुढे झाले. त्याचवेळी बिबट्या फासकीतून सुटला.
एका वन अधिकाऱ्यासह पाच ग्रामस्थांना जखमी करून तो बिबट्या जंगलमय भागात पळून गेला. तेव्हापासून वन खात्याचे १५ कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत.
बिबट्या जखमी असल्याने तो लवकर हातात येण्याची अपेक्षा केली जात आहे. बिबट्याला पकडण्यासाठी आता रत्नागिरी वन खात्याने मुंबईकडे मदतीची मागणी केली आह. लवकरच एक पथक मुंबईहून रत्नागिरीला येणार आहे.