पाली बाजारपेठेतील गोठ्यात घुसला बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 01:15 PM2020-11-19T13:15:17+5:302020-11-19T13:16:17+5:30

गोठ्यात घुसून बिबट्याने एका पाड्याला ठार मारल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी पाली बाजारपेठेत घडल्याने सध्या या भागात दहशत निर्माण झाली आहे. मुंबई - गोवा महामार्गालगत आणि पाली ग्रुप ग्रामपंचायतीच्या बाजूला राहणारे प्रवीण राऊत यांच्या घराशेजारील गोठ्यात शिरुन काही दिवसांपूर्वीच व्यायलेल्या गाईच्या वासराला बिबट्याने ठार मारले.

Leopards enter the barn in Pali market | पाली बाजारपेठेतील गोठ्यात घुसला बिबट्या

पाली बाजारपेठेतील गोठ्यात घुसला बिबट्या

googlenewsNext
ठळक मुद्देपाली बाजारपेठेतील गोठ्यात घुसला बिबट्याघटनास्थळी पाहाणी, पंचनामा

पाली : गोठ्यात घुसून बिबट्याने एका पाड्याला ठार मारल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी पाली बाजारपेठेत घडल्याने सध्या या भागात दहशत निर्माण झाली आहे.
मुंबई - गोवा महामार्गालगत आणि पाली ग्रुप ग्रामपंचायतीच्या बाजूला राहणारे प्रवीण राऊत यांच्या घराशेजारील गोठ्यात शिरुन काही दिवसांपूर्वीच व्यायलेल्या गाईच्या वासराला बिबट्याने ठार मारले.

बिबट्याने वासराच्या मानेचा चावा घेतला. या हल्ल्यात त्याचा जाग्यावरच प्राण गेला. मात्र हे वासरू बांधलेले असल्याने त्याला तेथेच टाकून बिबट्याने पळ काढला. बिबट्याची चाहुल लागली तेव्हा राऊत यांचा पाळीव श्वान मोठमोठ्याने ओरडत होता. गायही हंबरडा फोडत होती. मात्र, रात्री १.३०च्या सुमारास भुंंकणारा श्वान गोठ्याच्या उलट दिशेने भुंकत असल्याने त्या दिशेने राऊत आणि त्यांच्या घरच्यांनी पाहाणी केली. मात्र, बिबट्याबद्दलचा अंदाज आला नाही.

पहाटे ५ च्या सुमारास ते गोठ्यात दूध काढण्यासाठी गेले तेव्हा गोठ्याचा दरवाजा उघडल्यावर वासराची गाय सैरभैर झाली. गोठ्याची लाईट लावल्यानंतर वासरू मृतावस्थेतील दिसले. त्याची पाहणी केली असता त्याच्या मानेवर चावल्याच्या मोठ्या जखमा होत्या. त्यांनी सकाळी पोलीस पाटील अमेय वेल्हाळ यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी वेल्हाळ यांनी पाहणी केल्यावर वनपाल गौतम कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहाणी केली व पंचनामा केला.

याच दरम्यान त्यांचा रात्रीपासून गायब झालेला श्वान अचानक समोर आला. श्वानाकडे पाहात असताना त्याच्या पायावर जखम दिसली. बिबट्याने प्रारंभी श्वानावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा हल्ला फसल्याने तो त्याच त्वेशाने गोठ्यात घुसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हा भाग दाटीवाटीचा आहे. आजुबाजूला मोठ्या प्रमाणावर नागरीवस्ती आहे. मात्र, गेले सहा-सात महिने या भागात सदरचा बिबट्या नेहमी येतो. अनेक भटके आणि पाळीव श्वान भक्ष्य केली आहेत.

Web Title: Leopards enter the barn in Pali market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.