ग्रामीण भागातील विद्यार्थीही घेताहेत संगणकावर धडे
By admin | Published: March 13, 2017 01:58 PM2017-03-13T13:58:44+5:302017-03-13T13:58:44+5:30
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या १२२१ शाळा डिजिटल
ग्रामीण भागातील विद्यार्थीही घेताहेत संगणकावर धडे
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या १२२१ शाळा डिजिटल
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या १२२१ प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत़़ त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही संगणकावर धडे घेत आहेत़
संगणक युग असून यामध्ये जगाचा संपर्क अधिक जवळ आला आहे़ त्यामुळे एखाद्या बाबीची अवश्यक माहिती हवी असल्या ती तात्काळ उपलब्ध करण्यासाठी संगणकाचा वापर करण्यात येतो़ संगणकाचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक युगामध्ये संगणक हाताळता यावे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत़ यासाठी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी विशेष लक्ष ठेवले आहे़
डिजिटल स्कूल करण्यासाठी लोकसहभागाचा मोठा फायदा होत आहे़ बहुतांश शाळा डिजिटल करण्यासाठी लोकवर्गणीचा आधार घेण्यात आला आहे़ त्यामुळे या शाळा लवकर डिजिटल होत आहेत़ (शहर वार्ताहर)