खेडमध्ये ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:03+5:302021-06-11T04:22:03+5:30

खेड : शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवार, १० रोजी शहरातील तळ्याचे वाकण येथील मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचा २२ ...

'A letter for a bright future of Maratha youth' in Khed | खेडमध्ये ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’

खेडमध्ये ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’

Next

खेड : शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवार, १० रोजी शहरातील तळ्याचे वाकण येथील मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचा २२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाठवली व मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प पुन्हा बोलून दाखवला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एक कोटी पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ खेड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष स. तु. कदम, युवक प्रदेश सरचिटणीस अजय बिरवटकर, खेड शहराध्यक्ष सतीश चिकणे, खेड तालुका युवक अध्यक्ष ॲड. अश्विन भोसले, खेड महिला शहराध्यक्ष व खेडच्या नगरसेविका जयमाला पाटणे, खेड युवती शहराध्यक्ष ॲड. पूजा तलाठी, माजी नगरसेवक राजू संसारे, खेड शहर उपाध्यक्ष सुनील साळोखे, तुषार सापटे, मनोज कदम, प्रणव म्हापुसकर, अंजली घोले, सुवर्णा तेली, दिव्या पाथरे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

--------------------

खेड येथे राष्ट्रवादी युवकतर्फे ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेली पत्र राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, अजय बिरवटकर, स. तु. कदम, सतीश चिकणे यांनी पोस्टाच्या पेटीत टाकली.

Web Title: 'A letter for a bright future of Maratha youth' in Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.