वराडकर-बेलोसे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:02+5:302021-08-13T04:36:02+5:30
दापोली : आर.व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोली संचालित न.का. वराडकर कला रा.व्ही. बेलोसे वाणिज्य कै. शांतिलाल जैन विज्ञान कनिष्ठ ...
दापोली : आर.व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोली संचालित न.का. वराडकर कला रा.व्ही. बेलोसे वाणिज्य कै. शांतिलाल जैन विज्ञान कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांतर्फे ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.
प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे ग्रंथपाल तेजस रेवाळे यांनी डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. ग्रंथपाल ज्योती दुसाने यांनी जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शन आयाेजित केल्याचे सांगून या ग्रंथप्रदर्शनात अनेक पुस्तकांचा समावेश आहे. ही पुस्तके सर्वांनी वाचावीत, असे त्या म्हणाल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश निंबाळकर यांनी आपल्या येथे उपलब्ध असलेल्या ग्रंथांचा थोडक्यात परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी ऑनलाइनसुद्धा याचा लाभ घ्यावा, अशी इच्छा प्रकट केली.
प्रमुख पाहुणे नॅशनल संस्थेचे चेअरमन लियाखत रखांगे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा, संस्थेच्या चेअरमन जानकी बेलोसे यांनीही यावेळी मनाेगत व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षक विश्वंभर कमळकर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.