ग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 05:45 PM2020-01-18T17:45:31+5:302020-01-18T17:47:06+5:30

शासनाने २०१० साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

Library lifts ban on accreditation: Uday Samant | ग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंत

ग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंत

Next
ठळक मुद्देग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंतमालगुंड येथे अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे उद्घाटन

रत्नागिरी : शासनाने २०१० साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

मराठी विज्ञान परिषद मध्यवती व रत्नागिरी विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक येथे १८ ते २० जानेवारी या कालावधीत ५४वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी उदय सामंत बोलत होते.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. हेमचंद्र प्रधान स्वागताध्यक्ष मधुमंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

२०१२च्या एका निर्णयाद्वारे नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद करण्यात आले होते. आज या केशवसुत स्मारकात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली.

कोकण हे बुद्धिवंतांची भूमी आहे, या भूमीने अनेक भारतरत्न दिले अशा या भूमीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य मी समजतो, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध चर्चासत्रे आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारच्या सत्रात उच्च शिक्षणातील संधी या विषयावर अध्यक्ष डॉ. हेमचंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्र होणार आहे. सायंकाळच्या सत्रात प्रा. रेखा सिंघल यांचे काजू आंबा फणस यांची उपयोगिता या विषयावर व्याख्यान होईल.

मधुमंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली कविता वाचन होणार आहे. त्यानंतर रविवार, १९ जानेवारी रोजी उद्योगधंदे व भविष्यातील संधी या विषयावर चर्चासत्र होईल. अखेरच्या दिवशी जयगड बंदर व कातळशिल्पे यांना भेट व अभ्यास आयोजित करण्यात आला आहे
 

Web Title: Library lifts ban on accreditation: Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.