Ratnagiri News: मनसे कार्यकर्त्यांनी एलआयसी कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण, दहाजणांवर गुन्हा

By अरुण आडिवरेकर | Published: February 4, 2023 07:01 PM2023-02-04T19:01:16+5:302023-02-04T19:02:04+5:30

मारहाणीत एलआयसी कर्मचारी जखमी

LIC employee brutally beaten by MNS workers in Chiplun Ratnagiri district, Criminal charges filed against tens of people | Ratnagiri News: मनसे कार्यकर्त्यांनी एलआयसी कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण, दहाजणांवर गुन्हा

Ratnagiri News: मनसे कार्यकर्त्यांनी एलआयसी कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण, दहाजणांवर गुन्हा

Next

चिपळूण : शहरातील एलआयसी कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. यात हा कर्मचारी जखमी झाला असून, पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विष्णू शिंदे (वय ४२, खेंड,चिपळूण), गुरुप्रसाद आदिनाथ पाटील (२८, पानगल्ली, चिपळूण), श्रावणी सतीश चिपळूणकर (३५), शहजीन मुन्वर हुजरे (३५), स्मिता रेडीज (३५,) राजेंद गोंजारे (३७), स्वप्नील घारे (३८, सर्व चिपळूण) यासह अन्य तिघे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबतची फिर्याद संतोष सीताराम चव्हाण (५३, बुरुमतळी, चिपळूण) यांनी दिली आहे. संतोष चव्हाण हे शहरातील एलआयसी कार्यालयामध्ये उच्च श्रेणी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयात असताना दहाजण बेकायदेशीर जमाव जमवून त्यांच्या कार्यालयामध्ये शिरले. यावेळी चव्हाण यांना जाब विचारत त्यांनी कार्यालयातच मारहाण केली. या मारहाणीत चव्हाण यांच्या तोंडासह हातावर जखम झाली आहे.

Web Title: LIC employee brutally beaten by MNS workers in Chiplun Ratnagiri district, Criminal charges filed against tens of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.