पाचलमधून सौरदिव्यांचा प्रकाश झालाय गायब

By admin | Published: July 18, 2014 11:10 PM2014-07-18T23:10:20+5:302014-07-18T23:13:35+5:30

निकृष्ट काम : तीन महिन्याच्या आत दिवे बंद

The light of solar panels disappears from the pyalchalan | पाचलमधून सौरदिव्यांचा प्रकाश झालाय गायब

पाचलमधून सौरदिव्यांचा प्रकाश झालाय गायब

Next

पाचल : सर्वसामान्य जनतेचा विकास व्हावा, यासाठी शासन अनेक योजना आणत आहे. त्यापैकी एका योजनेद्वारे पाचल (ता. राजापूर) गावात सौरदिवे बसवण्यात आले. मात्र, हे सौरदिवे इतके निकृष्ट होते की, दिवे बसवल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आतच ते बंद पडले आहेत.
गावात प्रकाश पडावा, यासाठी रात्रीच्या वेळी भीती व धोका वाटू नये, म्हणून ग्रामपंचायत कार्यालयामार्फत मोक्याच्या जागी हे सौरदिवे बसवण्याऐवजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी आपापल्या हुकमी मतदारसंघात बसवले आहेत. दिवे बसवल्यामुळे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आपल्यासाठी बरेच काही तरी करत आहेत, असे सुरुवातीला मतदारांनासुद्धा वाटू लागले. परंतु हळूहळू सत्य बाहेर येऊ लागल्याने ग्रामस्थांचा संताप वाढू लागल्याचे सर्वत्र चित्र मिळत आहे. ग्रामपंचायतीने दिवे खेरदी करताना खात्रीलायक पुरवठा करणाऱ्या कंपनीला टेंडर द्यायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. निकृष्ट दिवे खरेदी करण्यात आले. टेंडर मंजूर करताना अर्थकरण दडल्याने या महत्त्वाकांक्षी योजनेचा बोजवारा उडाला आहे. मोठ्या रकमेची खरेदी दाखवून निम्म्या भागात खरेदी करण्यात आली. त्यामुळे या सौरदीप मालिकेतील बॅटरी हलक्या स्वरुपाची, तर सौरउष्णता खेचून घेणारी प्लेट एकदम निकृष्ट असल्याने हे सौरदिवे लवकर खराब झाले आहेत.
पाणलोट विकास कार्यक्रमातून खरेदी करण्यात आलेल्या सौरदिवे खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक दिवे १५ दिवसांच्या आत बंद पडले आहेत. खरेदी खरेतर कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अध्यक्ष, सचिव, सदस्य यांना मार्गदर्शन करणारे कृषी खात्याचे कर्मचारीसुद्धा या बोगस खरेदीत समाविष्ट झाले आहेत. या अधिकाऱ्यांनी कधीही चुकीच्या कामांना अथवा चुकीचे काम करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट चुकीचे काम करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे एका चुकीच्या निर्णयाला समर्थन मिळाल्याने सौर दिव्यासारखी मौल्यवान योजना अखेरची घटका मोजत आहे. एका बाजूस सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तर दुसरी बाजूला पाणलोट अध्यक्ष, कमिटी व अधिकारी अशा दोन्ही बाजू भ्रष्टाचारात सहभागी आहेत. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)
 

Web Title: The light of solar panels disappears from the pyalchalan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.