लोटे परिसरात विजेचा खेळखंडोबा

By Admin | Published: September 7, 2014 09:43 PM2014-09-07T21:43:07+5:302014-09-07T23:17:05+5:30

महावितरणबद्दल संताप : वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे दैनंदिन कामकाजात अडथळे

Lightning block in Lote area | लोटे परिसरात विजेचा खेळखंडोबा

लोटे परिसरात विजेचा खेळखंडोबा

googlenewsNext

आवाशी : लोटे (ता. खेड) परिसराला महावितरणकडून होणारा वीजपुरवठा गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे अनेक गावांना अंधारात राहण्याची वेळ येत आहे. मात्र, यामध्ये सुधारणा होण्याऐवजी समस्याच अधिक भेडसावत आहेत.
लोटे औद्योगिक वसाहत आणि परिसरातील आवाशी, गुणदे, लोटे, पिरलोटे, चिरणी, धामणदेवी, सोनगाव, घाणेखुंट, कोतवली, असगणी, लवेल, दाभीळ, सात्वीणगाव, मेटे यासह इतर गावांना लोटे महावितरणतर्फे वीजपुरवठा करण्यात येतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खबरदारीची उपाययोजना म्हणून दुरुस्तीच्या नावाखाली मे अखेरीस दुरुस्तीची कामे मोठ्या जोमाने हाती घेतली जातात. यावेळी संपूर्ण दिवसभर परिसर विजेविना कार्यरत असतो. औद्योगिक वसाहतीमुळे नागरिकांच्या सोयीसाठी असणाऱ्या बँका, पतसंस्था, निमशासकीय व खासगी कार्यालये यांना दैनंदिन कामकाज करताना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
दरवर्षीच्या समस्येत सुधारणा होण्याऐवजी वाढ होताना दिसून येते. यावर्षीचा पाावसाळा सुरु झाल्यापासून इथल्या वीजवाहिन्या तुटणे, वीजगळती होणे, झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित होणे, कार्यालयाच्या जनित्रातच बिघाड होणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. असे घडल्यास त्याची दुरुस्ती होण्यासाठी दोन दिवसांहून अधिक अवधी लागतो. याचा फटका छोटे व्यावसायिक, कार्यालये, उद्योजक यांना बसत आहे. व्यावसायिकांना आर्थिक व मानसिक भुर्दंड सहन करावा लागत असून, संताप व्यक्त होत आहे. या परिस्थितीत सुधारणा कधी होणार, असा प्रश्न आहे.(वार्ताहर)

Web Title: Lightning block in Lote area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.