लायन्स क्लब, रत्नागिरी नवीन कार्यकारिणीचा शपथग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:26+5:302021-07-14T04:36:26+5:30

रत्नागिरी : लायन्स इंटरनॅशनल संस्थेच्या लायन्स क्लब रत्नागिरीच्या नूतन कार्यकारिणीचा शपथग्रहण समारंभ लायन्स आय हॉस्पिटलच्या सभागृहात शासकीय नियमांचे ...

Lions Club, Ratnagiri swearing in ceremony of new executive | लायन्स क्लब, रत्नागिरी नवीन कार्यकारिणीचा शपथग्रहण सोहळा

लायन्स क्लब, रत्नागिरी नवीन कार्यकारिणीचा शपथग्रहण सोहळा

Next

रत्नागिरी : लायन्स इंटरनॅशनल संस्थेच्या लायन्स क्लब रत्नागिरीच्या नूतन कार्यकारिणीचा शपथग्रहण समारंभ लायन्स आय हॉस्पिटलच्या सभागृहात शासकीय नियमांचे पालन करून २५ सभासदांच्या उपस्थितीत झाला. ॲड. लायन शबाना वस्ता यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली तर सचिव म्हणून लायन अभिजित गोडबोले आणि खजिनदार म्हणून लायन गणेश धुरी यांनी शपथ घेतली. मावळत्या अध्यक्षा श्रेया केळकर यांनी नूतन अध्यक्षांकडे सूत्रे सोपविली.

मावळत्या अध्यक्षा लायन श्रेया केळकर, सचिव मनाली राणे, खजिनदार डॉ. शिवानी पानवलकर यांनी आपल्या कार्यकालाचा आढावा घेऊन क्लबमधील अनेक सभासदांचा मानचिन्ह देऊन सन्मान केला. या कार्यक्रमाला व्हर्चुअल प्लॅटफॉर्मवर प्रमुख पाहुणे मल्टिपल कौन्सिल चेअरमन लायन गिरीश मालपाणी यांनी मार्गदर्शन केले. लायन्स क्लब मालवण येथील माजी रिजन चेअरमन गणेश प्रभुलकर यांनी नूतन कार्यकारिणीला शपथ दिली तसेच मार्गदर्शन केले.

नूतन अध्यक्ष शबाना वस्तांसह कार्यकारिणीमधील सहसचिव अस्लम वस्ता, टेमर डॉ. शिवानी पानवलकर, टेल ट्विस्टर श्रद्धा कुळकर्णी, पीआरओ आहाना गोडबोले, गॅट चेअरमन श्रीपाद केळकर, जीएलटी चेअरमन दत्तप्रसाद केळुस्कर, जीएमटी चेअरमन डॉ. शेखर कोवळे, जीएसटी चेअरमन पराग पानवलकर, क्लब ॲडमिनीस्ट्रेटर श्रेया केळकर, एलसीआयएफ चेअरमन एमजेएफ सुनीलदत्त देसाई, बुलेटिन संपादक आणि मार्केटिंग अँड कम्युनिकेशन चेअरमन दत्तप्रसाद कुळकर्णी, आयटी चेअरमन दीप्ती फडके, लायन क्वेस्ट चेअरमन शिल्पा पानवलकर यांनाही शपथ देण्यात आली.

कार्यकारिणीमध्ये सल्लागार म्हणून ज्येष्ठ लायन डॉ. एमजेएफ रमेश चव्हाण, सुधीर उर्फ आप्पा वणजू, दीपक साळवी, प्रमोद खेडेकर, डॉ. संतोष बेडेकर, यश राणे, डॉ. शैलेंद्र भोळे, ओंकार फडके, सुप्रिया बेडेकर, क्षिप्रा कोवळे काम पाहणार आहेत. नूतन अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांनी मनोगतातून लायन्स क्लब रत्नागिरीला विविध सेवाकार्य करून उत्तुंग शिखरावर नेण्याचा विश्वास व्यक्त केला. लायन्स ट्रस्ट अध्यक्ष संतोष बेडेकर, माजी झोन चेअरमन गुलाम पारीख, नूतन झोन चेअरमन रमोद खेडेकर यांनीही शुभेच्छा दिल्या. नूतन रिजन चेअरमन संजू पटेल यांनी संदेश पाठवून प्रांतपाल यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. सचिव अभिजित गोडबोले यांनी आभार मानले.

Web Title: Lions Club, Ratnagiri swearing in ceremony of new executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.