रत्नागिरीत पाण्यातील वासराला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 06:13 PM2017-10-16T18:13:38+5:302017-10-16T18:17:52+5:30
सकाळच्या वेळी पाणी पिण्यासाठी आलेले वासरू पाय घसरून कारंजाच्या पाण्यात पडल्याची घटना आज (सोमवारी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथे घडली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरींनी तातडीने त्याला पाण्याबाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.
अरूण आडिवरेकर
रत्नागिरी , दि. १६ : सकाळच्या वेळी पाणी पिण्यासाठी आलेले वासरू पाय घसरून कारंजाच्या पाण्यात पडल्याची घटना आज (सोमवारी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथे घडली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरींनी तातडीने त्याला पाण्याबाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.
मारूती मंदिर येथील शिवपुतळ्याची दररोज सकाळी ७ वाजता नित्य पूजा केली जाते. या पूजेसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी महेश पाडावे, प्रसाद सावंत, देवेंद्र झापडेकर, समीर सावंत यांच्यासह इतर उपस्थित होते. त्याचवेळी मोकाट जनावरे त्याचठिकाणी असलेल्या कारंजाजवळ पाणी पिण्यासाठी आली. त्यातील एक वासरू दोन्ही पाय वर ठेवून पाणी पिण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी त्याचे पाय घसरले आणि ते पाण्यात पडले.
पाण्यात पडलेल्या वासराने पुन्हा वर येण्यासाठी धडपड सुरू केली. पण, त्याला पुन्हा वर येता नसल्याने ते पाण्यात बुचकळू लागले.
हा सारा प्रकार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यानी पाहिली. त्यांनी तातडीने तिथे धाव घेऊन वासराला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
अथक प्रयत्नानंतर त्या वासराला पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यामुळे त्या वासराला जीवदान मिळाले. पाण्यासाठी या परिसरात वारंवार जनावरे येत असतात त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.