मंडणगडात लाॅकडाऊनचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:14 AM2021-05-04T04:14:17+5:302021-05-04T04:14:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, मंडणगड तालुक्यात ...

Lockdown in Mandangad | मंडणगडात लाॅकडाऊनचा फज्जा

मंडणगडात लाॅकडाऊनचा फज्जा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मंडणगड : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, मंडणगड तालुक्यात साेमवारी झालेली गर्दी पाहता, लाॅकडाऊनचा पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्यात तालुका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे जनता व व्यापारी बिनधास्त असल्याचे पाहायला मिळाले. प्रशासनाकडून कारवाई होत नाही, म्हणून जीवनावश्यक वस्तूंबरोबरच शहरातील अन्य दुकानेही सुरू आहेत. शहरासह गावातील दुकाने ११ नंतरही सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

प्रशासनाकडून केवळ शासनाच्या आदेशाचे वाचन केल्याप्रमाणे जनतेला पंधरा दिवसांपूर्वी कळवल्यानंतर तालुक्यात विशेषत: शहरात लाॅकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात काेणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोमवारी शहरातील संपूर्ण बाजारपेठेत वर्दळ व वाहनांचे पार्किंग यासह जनसागर उसळला हाेता. यावेळी नगरपंचायत वा पोलीस यंत्रणेचे कर्मचारी कुठेही दिसले नाहीत. लाॅकडाऊनच्या सुरुवातीला नागरिक ११ नंतर शहर परिसरात कुठेही दिसत नव्हते. मात्र, आता संपूर्ण दिवसभर शहरात वर्दळ सुरू आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने जिल्हा बंदी लागू केलेली असताना, मंडणगडात मात्र या आदेशाचे कुठेही पालन होताना दिसून येत नाही. मंडणगड तालुक्यात होत असलेले विविध लग्नसमारंभ व अन्य कार्यक्रमास मुंबई, पुणे येथून नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करत आहेत.

गावातील ग्राम कृती दल अद्याप सक्रिय झालेले नाही. त्याचप्रमाणे तपासणी नाक्यावरून कोणत्या गावात किती नागरिक नव्याने आले आहेत, याची महिती देण्यात येत नाही किंबहुना गावात किती व कोण-कोण बाधित आहेत, याचीही माहिती या ग्राम कृती दलाकडे नाही. त्याचबरोबर खासगी टेम्पो ट्रॅव्हलर्स मुंबईसारख्या शहरातून प्रवासी वाहतूक करत आहेत, तर अनेक गावांत अन्य जिल्ह्यातील व्यापारी तालुक्यात येऊन कांदे, बटाटे व भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना विकत आहेत. शहरातील घरपोच सेवेचा विचार करता, ही यंत्रणा कुठेच कार्यरत नाही.

.....................

मंडणगड शहरात सोमवारी गर्दी झाली हाेती.

Web Title: Lockdown in Mandangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.