रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, 3 ते 9 जूनपर्यंत अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:45 PM2021-06-02T16:45:17+5:302021-06-02T16:51:28+5:30

CoronaVirus Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊन एक दिवसांने पुढे गेला आहे. 3 ते 9 जूनपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होणार आहे. २ जून रोजी रात्री १२ वाजातपासून ते ९ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे लॉकडाऊन असेल. या काळात सर्व प्रकारची दुकानं बंद राहणार आहेत. केवळ दुधाची होम डिलिव्हरी 11 वाजेपर्यंत करता येणार आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून प्रवेशासाठी आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रवेशासाठी आता ई पास अनिवार्य करण्यात आला आहे.

The lockdown in Ratnagiri district went ahead by one day, with implementation from June 3 to 9 | रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, 3 ते 9 जूनपर्यंत अंमलबजावणी

रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, 3 ते 9 जूनपर्यंत अंमलबजावणी

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊन एक दिवसांने पुढे गेलाजिल्ह्यात २ जूनच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार

रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊन एक दिवसांने पुढे गेला आहे. 3 ते 9 जूनपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होणार आहे. २ जून रोजी रात्री १२ वाजातपासून ते ९ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे लॉकडाऊन असेल. या काळात सर्व प्रकारची दुकानं बंद राहणार आहेत. केवळ दुधाची होम डिलिव्हरी 11 वाजेपर्यंत करता येणार आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून प्रवेशासाठी आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रवेशासाठी आता ई पास अनिवार्य करण्यात आला आहे.

सर्व प्रकारची खासगी, सरकारी वाहतूक बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी केवळ एसटी सुरू राहणार आहे. बँक आणि वित्तीय संस्था कामकाज शेतकऱ्यांचा विचार करता सुरू राहणार असून केवळ 10 टक्के उपस्थिती राहणार आहे. बँक, वित्तीय संस्था 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. वित्तीय संस्थांमध्ये केवळ शेतकऱ्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार सुरू राहतील. एमआयडीसीमधील अत्यावश्यक सेवेत नसेलेले उद्योग बंद राहणार असून एकूण 30 ते 40 टक्के उद्योग बंद राहणार आहेत. सर्व खासगी कार्यालयं बंद राहतील. शासकीय कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती राहील. केवळ अत्यावश्यक सेवेतील सरकारी कार्यालयं 15 टक्के उपस्थितीसह सुरू राहणार आहेत.

जिल्ह्यातील पेट्रोल पंप 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार; मालवाहतुकीसाठी हायवेवरील पेट्रोल पंप मात्र 24 तास सुरू राहणार आहेत. बियाणं, खते, किटकनाशके यांची दुकानं ठराविक कालावधीमध्ये सुरू राहणार आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार बंद राहणार; होम डिलिव्हरी बंद राहील. हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या होम डिलिव्हरीबाबत काही दिवसानंतर निर्णय होईल.

चिकन, मटन, मच्छिची दुकानं बंद राहतील. मेडिकल दुकानांमध्ये इतर सामानाची विक्री झाल्यास 10 हजारांचा दंड होईल. लग्नाच्या ठिकाणी कॉन्स्टेबल, तलाठी आणि व्हिडीओग्राफर असेल. केवळ 25 जणांची उपस्थिती राहील. अँन्टिजेन टेस्ट अनिवार्य राहील. रेल्वेनं येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्टेशन्सवर कोरोना चाचणी होणार आहे. शासकीय बांधकामं वगळता इतर सर्व प्रकारचे कामकाज बंद राहणार आहे. लसीकरण सुरू राहणार असून त्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही.

अर्धवट लॉकडाऊन नको, रत्नागिरी व्यापारी संघटना कठोर

गेले वर्षभर कमी अधिक प्रमाणामध्ये सुरु असलेले लॉकडाऊन, त्यामुळे व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. उदरनिर्वाहाचे तेवढेच साधन असल्याने आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात ढासळत चालली आहे. त्यामुळे काल केल्या गेलेल्या पुन्हा अधिकच्या ८ दिवसाच्या कडक लॉकडाऊनच्या घोषणेमुळे व्यापारी वर्ग संतापून उठला होता. 

रत्नागिरी व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष निखिल देसाई देसाई यांनी लॉकडाऊन करायचा असेल तर कडक करा अन्यथा सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी. येत्या २४ तासांमध्ये जर या निर्णयावर फेरविचार केला गेला नाही तर सगळी दुकाने उघडण्यात येतील, असाही इशारा दिला होता. लॉकडाऊन हे फक्त दुकानं किंवा हॉटेल साठी मर्यादित न ठेवता, सर्व शासकीय / खाजगी कार्यालये, बँक, रेल्वे वाहतूक सेवा, औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या, एस.टी. वाहतूक यासुद्धा पूर्णपणे बंद करण्यात याव्यात, अर्धवट असलेले लॉकडाऊन खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन फक्त कागदोपत्री न करता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अशी कठोर भूमिका  जिल्ह्यातील व्यापारी संघटनांनी मांडली होती.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी  जिल्ह्यातील व्यापाऱ्यासोबत चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली, या बैठकीसाठी जिल्हाधिकारी मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग आणि जिल्ह्यातील व्यापारी संघटनेचे एकूण ७० प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. त्यांनी आपल्या समस्या सामंतांना सांगितल्या. त्यावर अजून थोडी कळ सोसून, व्यापाऱ्यांनी शासनाने आखून दिलेले सर्व नियमांचे पालन करून शासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. कारण कोरोनाचे रत्नागिरीवर घोंघावणाऱ्या संकटाची भीषणता पाहता सर्वांनी एकमेकांना सहकार्य करूनच या महामारीतून बाहेर पडणे शक्य होणार असल्याचे सांगितले, त्यामुळे इतके महिने जसे सहकार्य केले तसेच सहकार्य पुढील काही दिवस कराल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.

व्यापाऱ्यांनी भूमिका बदलून शासनाला सहकार्य करण्याचे एक मताने मान्य केले. परंतु, कडक लॉकडाऊन लावण्याआधी एक दिवसाचा अवधी वाढवून मिळावा अशी त्यांनी मागणी केली. व्यापाऱ्यांच्या समस्या आणि त्यांनी केलेल्या विनंतीनुसार अनेक मुद्यांवर चर्चा झाल्यावर काही प्रमाणात तात्पुरते तोडगे सुद्धा मिळाल्याने सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी पुढील ८ दिवसाच्या कडक संचारबंदीसाठी आखण्यात आलेली नियमावली जाहीर केली.

Web Title: The lockdown in Ratnagiri district went ahead by one day, with implementation from June 3 to 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.