आज लोकअदालत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:29 AM2021-08-01T04:29:03+5:302021-08-01T04:29:03+5:30

दापोली : दापोली दिवाणी न्यायालयात दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये ...

Lok Adalat today | आज लोकअदालत

आज लोकअदालत

Next

दापोली : दापोली दिवाणी न्यायालयात दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये बँकांसह विविध प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये दोन - दोन पॅनल आहेत.

सुरक्षितस्थळी स्थलांतर

खेड : मुसळधार अतिवृष्टीचा तडाखा तालुक्यातील केळणे-भोसलेवाडीलाही बसला आहे. याठिकाणी दरड कोसळून मोठी हानी झाली आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी कोसळलेल्या दरडींमुळे घरांना धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ४९ बाधित ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीने सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.

जनावरांसाठी चारा

खेड : चिपळूणमधील पूरस्थितीत सर्वच घटकांचे नुकसान झाले आहे. सर्वच स्तरांतून जीवनावश्यक वस्तूंसह अन्य साहित्यांचे वाटप करण्यात येत आहे. यापाठोपाठच लोटे रोटरॅक्ट व रोटरी क्लबतर्फे जनावरांसाठी चाऱ्याची मदत करण्यात आली. मुरादपूर-पवारआळी येथील शेतकरी शुभम पवार यांचा गोठा उद्ध्वस्त होऊन गाय व म्हशींसाठी चारा उरला नव्हता. रोटरॅक्टच्या माध्यमातून गुणदे येथील तुषार आंब्रे यांनी चारा उपलब्ध करुन दिला.

तरुण धावले मदतीला

चिपळूण: महापुरात उद्ध्वस्त चिपळूणला मदत करण्यासाठी रत्नागिरी-भगवतीनगर भागातील तरुण एकटवले आहेत. येथील शिवशक्ती मित्रमंडळाचे कार्यकर्ते स्वच्छतेसह मदतीत गुंतले आहेत. यासाठी मंडळाचे अध्यक्ष अनिकेत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते चिपळूणमध्ये जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग, चिखल साफ करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

चिपळूण आगारातून बसफेऱ्या

चिपळूण : महापुराची झळ बसलेले येथील मध्यवर्ती बसस्थानक पुन्हा प्रवासी सेवेसाठी सज्ज झाले असून, नियमित दोन मार्गांवर २८ फेऱ्या सुरु केल्या आहेत. पाण्याखाली गेलेली विद्युत यंत्रणा पुन्हा सुरु करण्याच्यादृष्टीने आगार प्रशासन विशेष मेहनत घेत आहे. प्रवाशांची गैरसोय ओळखून तात्पुरती यंत्रणा उभी करुन तालुक्यातील पोफळी तसेच रत्नागिरी मार्गावर फेऱ्या सुरु केल्या आहेत. यात पोफळी मार्गावरील २४, रत्नागिरीतील ४ फेऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: Lok Adalat today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.