Lok Sabha Election 2019 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सेना-भाजपचे अखेर जमलं हो जमलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:47 PM2019-03-28T12:47:10+5:302019-03-28T12:51:21+5:30
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत याना पाठिंबा देण्याचा निर्णय अखेर भाजपने घेतला आहे. या दोन्ही पक्षांची दिलजमाई करण्यात अखेर पक्षश्रेष्ठीना यश आले आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत याना पाठिंबा देण्याचा निर्णय अखेर भाजपने घेतला आहे. या दोन्ही पक्षांची दिलजमाई करण्यात अखेर पक्षश्रेष्ठीना यश आले आहे.
येत्या ३० तारखेला अर्ज भरणार आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजप प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी केले
आहे.
ते म्हणाले की, कोल्हापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे, असे निर्देश दिले आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
युती म्हणून आपण राऊत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे आहे, फडणवीस यांनी दिलेल्या निदेर्शाप्रमाणे येत्या ३० तारखेला भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास मला वाटतो मी आवाहन करू इच्छितो तीस तारखेला भाजप पदाधिकाऱ्यांनी अर्ज भरण्याप्रसंगी उपस्थित रहावे आणि केंद्रांमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने खासदार विनायक राऊत यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांचे नाव घोषित होण्यापूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती परंतु मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे आता भाजपचे पदाधिकारी विनायक राऊत यांच्या प्रचाराचे काम वाडी-वस्तीवर करणार आहेत. मोठ्या मताधिक्क्याने ते विजयी होतील याकरिता आमचा प्रयत्न राहील असे लाड यांनी स्पष्ट केले.