'28 कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरे भागीदार; मराठी माणसाला मुंबईतून केलं हद्दपार'- राणेंचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 11:54 AM2019-04-02T11:54:06+5:302019-04-02T12:06:24+5:30

सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे

Lok Sabha Elections 2019 - Narayan rane allegations on Uddhav Thackeray partners in 28 companies | '28 कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरे भागीदार; मराठी माणसाला मुंबईतून केलं हद्दपार'- राणेंचा प्रहार

'28 कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरे भागीदार; मराठी माणसाला मुंबईतून केलं हद्दपार'- राणेंचा प्रहार

Next

रत्नागिरी - मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमी झाली, 1960-66 दरम्यान मुंबईत मराठी माणूस 60 टक्के होता तर आज मराठी माणूस 18 टक्के आहे. मुंबईतला मराठी माणूस कुठे गेला.वसई, बदलापूर, कल्याण याठिकाणी मराठी माणूस निघून गेले. ही स्थिती शिवसेनेनी आणली, उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. 28 कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. हे मी विधानसभेत पुराव्यानिशी मांडले, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांचा निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर राणे यांनी जाहीर सभेत शिवसेनेवर टीका केली आहे. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की. मागील निवडणुकीत भाजपासोबत शिवसेनेने निवडणूक लढवली आणि स्वत:चा फायदा करुन घेतला. सलग 5 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने शिवसेनेनी टीका केली. टीकेशिवाय काहीच केलं नाही. युतीत सडेपर्यंत कशाला राहिलात? अमित शहांना अफजल खान म्हटलं आणि परवा त्यांचाच फॉर्म भरायला गांधीनंगरला गेले. शिवसेनेची प्रवृत्ती विकृत आहे. उपकार घ्यायचे, सत्तेचा फायदा उचलायचा हे शिवसेनेचं दुटप्पी धोरण असल्याचं राणे यांनी सांगितले 

तर उद्धव ठाकरेंचे भाषण साडे पंधरा मिनिटेच असतं. भाषणात विचार नाही तर अविचार मांडले जातात. कोकणासाठी काय केले, कोकणासाठी शिवसेनेचं योगदान काहीच नाही. विकास आणि उद्धव ठाकरे हे समीकरण कधीच जुळणार नाही असा प्रहार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला. 

दरम्यान, निलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज भरताना ही प्रचंड गर्दी पाहून 23 मेच्या निकालाची वाट न पाहता आजच विजय झाल्यासारखा भासतंय  शिवसैनिकांचा आणि भाजपाचा आतमधून निलेश राणेंना पाठिंबा आहे. या निवडणुकीत आमची लढत कोणासोबत नाही, तेवढ्या तोडीचा माणूस आमच्यासमोर नाही. ही एकतर्फी निवडणूक आहे. 23 मे ला आनंद व्यक्त करण्यासाठी तयार रहा. तुम्ही प्रचारक आहात. उन्हाळ्यात फ्रीजची गरज आहे. त्यामुळे फ्रीज निशाणी घराघरात पोहचवा, परिवर्तन साध्य करण्यासाठी मतदान करा. मतदानाची प्रोत्साहित करा असं आवाहन राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.  

तसेच पाच वर्षात विनायक राऊतांनी 1 कोटीचं काम तरी केलं का ? पंतप्रधान ग्रामपंचायत रस्ता योजनाही खासदाराला माहित नाही. जिल्हा परिषदेत आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. निलेशने 138 कोटी पाच वर्षात आणले होते. पाच वर्षात काय केलं हे सांगून मत मागावी. विनायक राऊतांना धड हिंदी बोलता येत नाही. वडापाव हा लोकसभेत मांडण्याचा विषय आहे का? एसएससीला दोनदा नापास झालेल्या माणसाला लोकसभेत पाठवलं ही लोकांची चूक आहे. नारायण राणेंना शिव्या घालायचा हा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी विनायक राऊतांना दिला आहे अशी टीका राणे यांनी विनायक राऊंतांवर केली. 

Web Title: Lok Sabha Elections 2019 - Narayan rane allegations on Uddhav Thackeray partners in 28 companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.