लोकमंच : संकटांचे दशक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:28 AM2021-04-03T04:28:07+5:302021-04-03T04:28:07+5:30

या संकटांच्या दशकात आत्मघातकी वृत्ती, आत्महत्यांची संख्या चढती, वाढती राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच गरज आहे ती आमच्यासारख्या अनुभवी ...

Lokmanch: Decades of Crisis! | लोकमंच : संकटांचे दशक !

लोकमंच : संकटांचे दशक !

Next

या संकटांच्या दशकात आत्मघातकी वृत्ती, आत्महत्यांची संख्या चढती, वाढती राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच गरज आहे ती आमच्यासारख्या अनुभवी मंडळांच्या मार्गदर्शनाची, समुपदेशनाची. सकारात्मक विचारांची पेरणी करावी लागेल. मनोरंजनाची खमंग फोडणीही द्यावी लागेल. जरी अनेक विघ्ने आली तरी ‘पैसा’ ही बाबसुद्धा फार ताकदवान ठरते. तेव्हा तरुण मुलींनीही लग्न करताना होणाऱ्या नवऱ्याची आर्थिक अवस्था सर्वप्रथम तपासावी, हे मी आवर्जून सांगेन. प्रपंचाच्या कौटुंबिक खर्चाचे एक बजेट असते. उत्पन्नच नसेल तर ते कोसळते. मग कर्ता कुटुंबप्रमुखही उन्मळून पडतो! म्हणूनच बचत, गुंतवणूक आणि आर्थिक शिस्त यांना पर्याय नाही. येत्या विघ्नदशकात आणि नंतरही काही नवे प्रवाह हळूहळू दिसणार आहेत. उदाहरण समजा, एक ‘जोडी’ लग्नासाठी उत्सुक आहे. तो बेरोजगार आहे. तिला बरा जॉब मिळाला आहे. ती नोकरीत कायम झाल्यावर जॉबसाठी दिवसभर कामावर जाईल. तो घरगृहस्थी सांभाळेल. होणाऱ्या बाळाची काळजी घेईल. त्याला ‘हाऊसहजबंड’ म्हणतात. ही नवी जीवनशैली अनैसर्गिक म्हणता येणार नाही. ती एक नवी तडजोड आहे.

ज्या व्यवसायाला मागणी आहे, तो करण्यात कसलाही कमीपणा नाही. माझ्यासमोर लहानाचा मोठा झालेला विक्रांत नावाचा तरुण चायनीज फूडच्या उपाहारगृहाची पूर्ण व्यवस्था सांभाळू लागला. जगणे, टिकणे, कमाई करणे महत्त्वाचे. प्रतिष्ठेच्या कल्पनाही आता बदलत चालल्या आहेत. विवाहाशिवाय सहजीवन (लिव्ह इन रिलेशन) जगणाऱ्या जोड्या मोठ्या शहरात बिनधास्त होताना दिसत आहेत. अनेकांनी ‘सिंगल’ स्टेटससुद्धा पसंत केले आहे. एकमेकांना साथ देत या वादळावर मात करणे सर्वांत महत्त्वाचे !

- माधव गवाणकर, दापोली

Web Title: Lokmanch: Decades of Crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.