लोकमान्य टिळक स्मारक अद्याप बंदच, पर्यटकांना बाहेरूनच दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:31 IST2020-12-22T17:30:23+5:302020-12-22T17:31:48+5:30
Tilak Smarak Mandir Ratnagiri- कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित केल्यापासून शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान अद्याप बंद आहे. पर्यटकांसाठी मंदिरे खुली करण्यात आली, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, लोकमान्य टिळक स्मारक खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे पर्यटकांना बाहेरूनच स्मारकाचे दर्शन घेऊन माघारी फिरावे लागत आहे.

लोकमान्य टिळक स्मारक अद्याप बंदच, पर्यटकांना बाहेरूनच दर्शन
रत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित केल्यापासून शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान अद्याप बंद आहे. पर्यटकांसाठी मंदिरे खुली करण्यात आली, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, लोकमान्य टिळक स्मारक खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे पर्यटकांना बाहेरूनच स्मारकाचे दर्शन घेऊन माघारी फिरावे लागत आहे.
जिल्ह्यात देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. रत्नागिरीसह गणपतीपुळे, पावस येथे पर्यटक भेटी देत असतात. त्याचवेळी शहरातील थिबा राजवाडा आणि लोकमान्य टिळक स्मारकांना पर्यटक आवर्जून भेट देतात. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना लोकमान्य टिळक स्मारकाचे विशेष आकर्षण असते.
टिळक स्मारक बंद असल्याने पर्यटकांना बाहेरूनच परत फिरावे लागत आहे. पर्यटकांचा ओघ वाढत असतानाच स्मारक पर्यटकांसाठी खुले करणे आवश्यक आहे. टिळक स्मारक पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून, त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पर्यटक सातत्याने भेटी देत असल्याने स्मारकांची देखभाल दुरूस्ती होणे गरजेचे आहे.
लोकमान्य टिळक जन्मस्थान कोरोना कालावधीत बंद करण्यात आले होते. अनलॉकमध्ये पर्यटनस्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. पर्यटकांचा ओघ सुरू झाला असला तरी स्मारक बंद असल्याने पर्यटकांना प्रवेशव्दारातूनच मागे फिरावे लागत आहे.
- राजाभाऊ लिमये, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, रत्नागिरीे