चिपळुणात आज लोकमतचे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:18+5:302021-07-07T04:39:18+5:30
चिपळूण : सामाजिक बांधिलकीचे भान कायम जपणाऱ्या ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञ राज्यभर सुरू आहे. रत्नागिरीतील उत्तम प्रतिसादानंतर आता बुधवार ७ ...
चिपळूण : सामाजिक बांधिलकीचे भान कायम जपणाऱ्या ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञ राज्यभर सुरू आहे. रत्नागिरीतील उत्तम प्रतिसादानंतर आता बुधवार ७ जुलै रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या माध्यमातून चिपळूणमधील विवेकानंद सभागृह येथे सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे होणार आहे.
यावर्षी कोरोनामुळे रक्ताची गरज वाढली आहे. लोक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी असल्याने नियमित होणारे रक्तदानही कमी झाले आहे. राज्यभर हीच स्थिती आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा तथा बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर २ ते १५ जुलै यादरम्यान रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सहा शिबिरे होणार असून, त्यातील दोन शिबिरे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात झाली आहेत. त्यानंतर आता चिपळुणात शिबिर होणार आहे. या रक्तदान शिबिरासाठी चिपळुणातील रोटरी क्लब या संस्थेचे विशेष सहकार्य लाभले आहे. हे शिबिर सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहे.
आपले नेहमीचे काम सांभाळूनही आपल्याला समाजासाठी काहीतरी करता येते. त्यासाठीचा एक पर्याय म्हणजे रक्तदान! सध्या प्रत्येक जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे चिपळूणमध्ये लोकमत आणि रोटरी क्लब ऑफ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होत आहे. सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन अधिकाधिक लोकांनी यात सहभागी होऊन रक्तदान करावे.
हे करू शकतात रक्तदान
१८ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्ती
कोरोना लसीचा पहिला डोस झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते.