संगमेश्वरात मंदिरातून ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:16+5:302021-07-12T04:20:16+5:30
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे येथील श्रीराममंदिर फोडून चोरट्यांनी सोने, चांदी व पितळेचे दागिने आणि रोख रक्कम ...
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे येथील श्रीराममंदिर फोडून चोरट्यांनी सोने, चांदी व पितळेचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४८,३०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरोधात संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमेश्वर पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबत मंदिराचे पुजारी अनिल ढोल्ये यांनी फिर्याद दिली आहे. कोंडअसुर्डे येथील श्रीराम मंदिराच्या बाजूचे दरवाजाचे कुलूप व मंदिराचे आतील लोखंडी कपाट व त्यातील लॉकर चोरट्यांनी फोडून सोन्याचे व चांदीचे व पितळेचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४८,३०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी १२ ते शुक्रवार दुपारी ११.३० या कालावधीत घडला आहे. नेहमीप्रमाणे पुजारी शुक्रवारी सकाळी पूजेसाठी आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी हा प्रकार ग्रामस्थांना सांगितला. त्यानंतर संगमेश्वर पोलीस स्थानकात चोरीबाबत फिर्याद दाखल करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हेड काॅन्स्टेबल व्ही. व्ही. कोष्टी करत आहेत.