माळवाशी येथे वणव्यामुळे लाखोंचे नुकसान
By admin | Published: March 8, 2017 05:23 PM2017-03-08T17:23:14+5:302017-03-08T17:23:14+5:30
काजू जळून खाक, शेतकऱ्यांमधून तीव्र संताप
माळवाशी येथे वणव्यामुळे लाखोंचे नुकसान
देवरूख : माळवाशी येथे लागलेल्या आगीने परिसरात काजू जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. ऐन काजू हंगामाच्या काळात अज्ञाताने लावलेल्या या आगीमुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. झालेल्या या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी व्यक्त होत आहे.
माळवाशी ङ्खफाट्यानजीक महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी १ च्या दरम्यान आग लागली. वारा असल्याने ही आग परिसरात पसरली. त्यात अनेक शेतकऱ्यांच्या काजू आगीत होरपळून खाक झाल्या. ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न येथील ग्रामस्थांनी केला, परंतु आगीचे प्रमाण मोठे असल्याने वणवा आटो्नयात येऊ शकला नाही. माळवाशी येथील रहिवासी दिलीप धोंडू मोरे यांच्या २५० काजू आगीत जळून खाक झाल्या. मोरे यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. बने या शेतकऱ्याच्या १२५ काजू आगीत जळाल्या. पाण्याची पाईपलाईनही या आगीत जळून गेली. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून याबाबत योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत. पाटगाव घाटीपासून ते अगदी आंबव कॉलेजच्या परिसरापर्यंत वणवे लावण्याचे प्रमाण वाढले असून, याबाबत संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)