कमी क्षमतेचा टाॅवर, शाेभेचे बाहुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:11+5:302021-07-07T04:38:11+5:30
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव - जाकादेवी दशक्रोशीत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बीएसएनएलसह खासगी कंपन्यांच्या टॉवरची मोबाईल रेंज ...
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव - जाकादेवी दशक्रोशीत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बीएसएनएलसह खासगी कंपन्यांच्या टॉवरची मोबाईल रेंज गायब झाली आहे. त्यामुळे जास्त ग्राहक लोकसंख्येच्या दृष्टीने कमी क्षमतेचे टॉवर कुचकामी ठरत आहेत.
जाकादेवी - खालगाव दशक्रोशीला संलग्न असलेल्या ३० ते ३५ गावांमध्ये ही समस्या गेले आठ ते दहा दिवस सुरू आहे. जाकादेवी येथील उभारण्यात आलेला टॉवर या परिसरात शोभेचे बाहुले बनला आहे. जाकादेवीतील बीएसएनएल टॉवरची क्षमता ३०० एवढी असून, ग्राहक हजारोंच्या पटीने आहेत. सध्या मोबाईल सेवा ठप्प असल्याने बँकांचे व्यवहार, पतसंस्थांची कामे, कार्यालयीन कामकाज, ऑनलाईन शिक्षणात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या विस्कळीत सेवेमुळे जाकादेवी, खालगाव, मालगुंड, खंडाळा परिसरातील ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.