साखरतर‌ येथील मासेमारी नौका सुदैवाने बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 02:25 PM2021-08-02T14:25:51+5:302021-08-02T14:33:06+5:30

fisherman Ratnagiri : मासेमारी बंदीचा कालावधी संपताच अनेकांनी मासेमारीसाठी नौका समुद्रात नेल्या. मासेमारीच्या पहिल्याच दिवशी समुद्रात गेलेल्या रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील एका नौकेचे इंजिन दहा वावात अचानक बंद पडले.

Luckily, the fishing boat at Sakhartar survived | साखरतर‌ येथील मासेमारी नौका सुदैवाने बचावली

साखरतर‌ येथील मासेमारी नौका सुदैवाने बचावली

Next
ठळक मुद्देसाखरतर‌ येथील मासेमारी नौका सुदैवाने बचावलीवरवडे किनारी आसरा; नऊ खलाशी सुखरूप

रत्नागिरी : मासेमारी बंदीचा कालावधी संपताच अनेकांनी मासेमारीसाठी नौका समुद्रात नेल्या. मासेमारीच्या पहिल्याच दिवशी समुद्रात गेलेल्या रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील एका नौकेचे इंजिन दहा वावात अचानक बंद पडले. एकीकडे खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे वेगवान वारा या कचाट्यात सापडलेली नौका सावरत सावरत वरवडे किनाऱ्यावर लागली. सुदैवाने या नौकेवरील ९ खलाशी बालंबाल बचावले.

शासनाने जाहीर केलेल्या मासेमारी बंदीचा कालावधी ३१ जुलै रोजी संपला. त्यानंतर ट्रॉलिंग, गिलनेटसारख्या नौका मासेमारीसाठी सज्ज झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात मासळी चांगली मिळत असल्यामुळे समुद्रात जाण्यासाठी मच्छीमारांची लगबग असते.

रविवारी सकाळी अनेक मच्छीमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. साखरतर येथील एका मच्छीमाराची नौकाही मासेमारीसाठी होती. सकाळी मासेमारीसाठी बाहेर पडलेली नौका दहा वाव समुद्रात जाळे टाकून होती. खवळलेल्या समुद्रात अचानक नौकेचे इंजिन बंद पडल्याची जाणीव झाली.

वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर नौका भरकटू लागली. त्या नौकेवर नऊ खलाशी होते. वारा आणि लाटांबरोबर ही नौका भरकटत वरवडे किनाऱ्यावर येऊन विसावली. सुदैवाने पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना होता होता वाचली.

किनाऱ्यावर वेगाचे वारे

वातावरण बिघडल्यामुळे किनाऱ्यावर वेगाने वारे वाहत आहेत. समुद्र खवळलेला असून, पाण्यालाही प्रचंड करंट आहे. मच्छिमारांना सावधानतेचाही इशारा देण्यात आला आहे. या परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून मच्छीमार समुद्रात जात आहेत.

सध्या प्रत्येक नौकेला शंभर ते दीडशे किलो चालू कोळंबी मिळत असल्याचे मच्छीमार सांगत आहेत. किलोला दोनशे ते अडीचशे रुपये दर सहज मिळतो. दोन महिने नौका बंद असल्यामुळे मच्छीमार बदलत्या वातावरणाचा विचार करत नसल्याचे दिसत आहे.

Web Title: Luckily, the fishing boat at Sakhartar survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.