माभळे जाधववाडी अतिसंवेदनशील क्षेत्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:34 AM2021-04-23T04:34:42+5:302021-04-23T04:34:42+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माभळे गावातील जाधववाडी, भिडेवाडी, बौद्धवाडी, गुरववाडी अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या वाड्यांतून ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माभळे गावातील जाधववाडी, भिडेवाडी, बौद्धवाडी, गुरववाडी अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या वाड्यांतून प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत माभळेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, तर आरोग्य विभाग सिद्ध झाला असून, कोरोना तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत.
संगमेश्वर तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामध्ये माभळे गावातील चार वाड्यांमध्ये ७२ रुग्ण सापडले आहेत, तर तिघांचा मृत्यू झाला. माभळे गावाला अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. चार वाड्यांमध्ये कोरोना तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी शहाजी मोटे आणि आरोग्य कर्मचारी पोमेंडकर यांनी गावात जाऊन कोरोना तपासण्या करण्यास सुरुवात केली आहे. सरपंच रोशनी घडशी, उपसरपंच नंदकुमार जोशी, रमेश घडशी, तसेच सदस्यांनी अत्यावश्यक सेवा पुरविण्यास सुरुवात केली आहे. तसेच चार वाड्यामंधील रुग्णांची तपासणी, तसेच काही जणांना कोविड सेंटरला हलविण्यात आले आहे. चार वाड्यांमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच ग्रमपंचायतीने वाड्यांतील प्रवेशद्वारावर राहून दक्षता येण्यास सुरुवात केली आहे.
.................................................
संगमेश्वर जवळच्या माभळेमधील चार वाड्यांच्या प्रवेशद्वारावर दक्षता म्हणून अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी डाॅ. शहाजी मोटे, उपसरपंच नंदकुमार जोशी यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांची चाैकशी केली.