समुद्राचे निळे पाणी अकस्मात हिरवे, माडबन समुद्रकिनारी हिरव्या रंगाच्या लाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:59 AM2020-12-16T11:59:16+5:302020-12-16T12:01:14+5:30
Rajapur, Sea, Ratnagiri राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रकिनारी हिरव्या रंगाच्या लाटा पाहावयास मिळत आहेत. परिसरातील समुद्राचे निळे पाणी अकस्मात हिरवे झाल्याने स्थानिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. समुद्रात फेसाळणाऱ्या लाटा अचानक हिरव्या रंगाच्या दिसत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
राजापूर : तालुक्यातील माडबन समुद्रकिनारी हिरव्या रंगाच्या लाटा पाहावयास मिळत आहेत. परिसरातील समुद्राचे निळे पाणी अकस्मात हिरवे झाल्याने स्थानिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. समुद्रात फेसाळणाऱ्या लाटा अचानक हिरव्या रंगाच्या दिसत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
नॉकटिल्युका या समुद्रातील प्राण्यामुळे पाण्याचा रंग बदललेला दिसतो आहे. नॉकटिल्युका सिंटीलांस या शास्त्रीय नावाने तो ओळखला जातो. सध्या समुद्रात दिसणाऱ्या निऑन लाईट्ससारख्या हिरव्या निळ्या प्रकाशाने तो चर्चेत आला आहे. सी स्पार्पल म्हणूनही तो ओळखला जातो.
दिवसा लालसर रंगाने दिसणारा हा प्राणी सध्या हिरवट रंगाचा दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे या प्राण्याने आपल्या शरीरात पेडीमोनाज नॉकटिल्युका या शैवालवर्गीय सजीवांना आसरा दिला आहे. त्यामुळे तो हिरवट दिसतो आणि त्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून अन्नही प्राप्त करू शकतो.