राजापुरात तीन केंद्रांवर माेफत शिवभाेजन थाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:30 AM2021-04-21T04:30:57+5:302021-04-21T04:30:57+5:30
राजापूर : संचारबंदीच्या काळात गरजूंची परवड हाेऊ नये, यासाठी शिवभाेजन थाळी माेफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची अमलबजावणी ...
राजापूर : संचारबंदीच्या काळात गरजूंची परवड हाेऊ नये, यासाठी शिवभाेजन थाळी माेफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची अमलबजावणी सुरू करण्यात आली असून, तालुक्यातील तीन केंद्रांवर माेफत शिवभाेजन थाळी देण्यास सुरूवात झाली आहे.
राजापूर एस. टी. आगारासह ओणी व कोंड्ये येथे यापूर्वी शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. येथील प्रशासनाकडून तिन्ही केंद्रांना मान्यता देण्यात आल्या आहेत. शिवाय थाळीची मर्यादा शंभरवरून दीडशेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तालुक्यात मोफत शिवभोजन थाळी तीन केंद्रांवरून सुरु झाली आहे. तालुक्यात पाचलसह अन्य काही ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरु करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी राजापूर दौऱ्यावर येऊन गेलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली होती. आता तालुक्यात आणखी किती ठिकाणी शिवभोजन केंद्र केव्हा सुरु होतात, याची प्रतीक्षा लागली आहे.