रत्नागिरी जिल्ह्यात १० अर्ज अवैध, सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणातच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 03:41 PM2024-10-31T15:41:49+5:302024-10-31T15:42:59+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी दाखल झालेल्या ५५ उमेदवारी अर्जांमधील दहा अर्ज अवैध ठरले आहेत. प्रमुख राजकीय पक्षांमधील ...
रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी दाखल झालेल्या ५५ उमेदवारी अर्जांमधील दहा अर्ज अवैध ठरले आहेत. प्रमुख राजकीय पक्षांमधील सर्व उमेदवारांसह एकूण ४५ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
दापोली आणि राजापूर मतदारसंघात प्रत्येकी १ तर गुहागर आणि चिपळूण मतदारसंघात प्रत्येकी ४ असे दहा उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. सूचक कमी, प्रतिज्ञापत्र नाही, प्रतिज्ञापत्र प्रमाणित नाही, पक्षाचा एबी फॉर्म नाही, अशा कारणांमुळे हे अर्ज अवैध ठरले आहेत. मात्र, प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणातच आहेत. सद्यस्थितीत राजापूर, रत्नागिरी आणि गुहागरमध्ये प्रत्येकी ९, चिपळूणमध्ये ८ तर दापोलीमध्ये १० असे ४५ अर्ज वैध ठरले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ अर्ज वैध
सावंतवाडीत १४, कुडाळमध्ये ११ आणि कणकवलीत ९ असे ३४ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीत सावंतवाडीत ५ आणि कुडाळमध्ये १ असे ६ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे २८ अर्ज वैध ठरले आहेत. या २८ अर्जांमध्ये सावंतवाडी ९, कुडाळ ९ आणि कणकवलीतील १० अर्जांचा समावेश आहे.